अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ICC T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी २५ मे रोजी रवाना झाली आहे. यामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सहभागी होते. उर्वरित खेळाडू आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यानंतर रवाना होतील.
मात्र, पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीलाही मुख्य प्रशिक्षकासह अमेरिकेला जाणे आवश्यक होते. मात्र तो जाऊ शकला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला अमेरिकेला रवाना होणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या तुकडीत स्थान मिळू शकले नाही. काही महत्त्वाच्या पेपर्सला होणारा विलंब हे त्याचे कारण आहे.
रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू मुंबईत पोहोचले आणि प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बाकीच्या टीमसोबत अमेरिकेला रवाना झआले, पण कोहली संघासोबत दिसला नाही. आता बातमी आली आहे की, विराट ३० मे रोजी पेपरवर्क पूर्ण करून अमेरिकेला जाणार आहे.
म्हणजेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या सराव तो सहभागी होऊ शकणार नाही.
कोहलीशिवाय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याही पहिल्या बॅचसोबत गेला नाही. हार्दिक सध्या लंडनमध्ये असून तेथून थेट संघात सामील होणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर ५ दिवसांनी न्यूयॉर्कमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होईल.
कोहलीचा फॉर्म पाहून भारतीय चाहते खूप खूश आहेत. IPL २०२४ मध्ये विराटने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या मोसमात तो ऑरेंज कॅपसाठीही पात्र ठरला आहे. त्याने १५ सामन्यात ७४१ धावा केल्या, त्याने १५३ पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्याची आयपीएल कारकिर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा रवाना होतील. सॅमसनने बोर्डाला सांगितले की, न्यूयॉर्कला जाण्यास उशीर होण्याचे कारण 'दुबईतील वैयक्तिक काम' आहे.
टवर्ल्डकपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज
राखीव: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.