भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लंडनहून भारतात आला आहे. बांगलादेशसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर विराट कोहली लंडनला गेला होता.
विराटचे मुंबई विमानतळावर आगमन होताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. यावेळी एका चाहत्याने विराट कोहलीला एक अनोखी मागणी केली, जी ऐकून तो स्वतःही चकित झाला.
खरंतर, विराट कोहली त्याच्या कारकडे जात असताना मागून एका चाहत्याने हाक मारली आणि म्हणाला, 'बॉर्डर-गावस्कर (BGT) में आग लगानी है सर.'
विराट कोहलीला सुरुवातीला काहीच समजले नाही, पण नंतर त्याने चाहत्याशी सहमती दर्शवली आणि खास रिअॅक्शन दिली जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
पहिला सामना, १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विल्यमसन आणि विल यंग.