टी-20 वर्ल्डकप २०२४ मधील तीनपैकी ३ सामने जिंकून भारतीय क्रिकेट संघ सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. आता त्यांचा सामना इन्फॉर्म ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानशी होणार आहे, ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत धुमाकूळ घातला आहे.
टीम इंडिया साखळी फेरीत ग्रुप अ मध्ये. हा ग्रुप या स्पर्धेतील सर्वात सोपा ग्रुप होता. त्यामुळे भारतीय संघाला साखळी फेरीत विशेष अडचणींचा सामना करावा लागला नाही. मात्र आता सुपर-८ मध्ये टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे.
सुपर-८ मध्ये खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, भारतीय संघात ३ खेळाडू असे आहेत जे सध्या फॉर्मात नाहीत. त्यांचे फॉर्ममध्ये नसणे हे सुपर ८ मध्ये भारताला महागात पडू शकते.
या संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघाचा रन मशीन विराट कोहलीची बॅट आतापर्यंत शांत राहिली, ही टीम इंडियासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. विराटने आतापर्यंत ३ सामन्यात केवळ ५ धावा केल्या आहेत. तर अमेरिकेविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला.
पाकिस्तानविरुद्ध शिवम दुबेची बॅट पूर्णपणे शांत होती. पण USA विरुद्ध त्याने ३१ धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली आणि त्याला पुन्हा गती मिळाली. मात्र, सुपर ८ मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या संघांशी होणार आहे.
आता दुबे त्यांच्याविरुद्धच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहणे बाकी आहे. मात्र, विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर दुबे विशेष काही करू शकलेला नाही. आयपीएलच्या उत्तरार्धात शिवमची कामगिरी अगदी सामान्य होती.
भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासाठी आतापर्यंत हा विश्वचषक अजिबात खास ठरला नाही. या वर्ल्ड कपमध्ये जडेजाने आतापर्यंत एकही धाव केली नाही, तसेच, एकही विकेट घेतली नाही. जडेजासाठी सुपर ८ मध्ये फॉर्ममध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा भारताचे नुकसान होऊ शकते.
संबंधित बातम्या