Republic Day : फक्त कोहलीलाच जमली अशी ‘विराट’ कामगिरी, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी झळकावलं शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Republic Day : फक्त कोहलीलाच जमली अशी ‘विराट’ कामगिरी, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी झळकावलं शतक

Republic Day : फक्त कोहलीलाच जमली अशी ‘विराट’ कामगिरी, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी झळकावलं शतक

Jan 26, 2025 07:42 PM IST

भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे ज्याने प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

Republic Day : फक्त कोहलीलाच जमली अशी ‘विराट’ कामगिरी, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी झळकावलं शतक
Republic Day : फक्त कोहलीलाच जमली अशी ‘विराट’ कामगिरी, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी झळकावलं शतक (REUTERS)

भारत आज आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. पण प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला शतक झळकावण्याचा पराक्रम करणाऱ्या भारतीय फलंदाजाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? प्रजासत्ताक दिनी शतक झळकावण्याचा पराक्रम विराट कोहली याने केला आहे.

विराट कोहलीने १३ वर्षांपूर्वी ॲडलेडमध्ये २६ जानेवारी २०१२ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.

विराटचं प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी शतक 

विशेष म्हणजे विराट कोहलीने स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टलाही शतक झळकावण्याचा कारनामा केला आहे. विराट कोहलीने ६ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनी इंग्लंडविरुद्ध शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. 

अशाप्रकारे, विराट कोहली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू हे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शतकाच्या अगदी जवळ पोहोचले होते, पण शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरले. मात्र, विराट कोहलीच्या नावावर हा खास विक्रम नोंदवला गेला आहे.

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांसोबत २९५ एकदिवसीय आणि १२५ टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विराट कोहलीने कसोटी सामन्यात ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या २५४ धावा आहे. विराटने ३० शतके आणि ७ द्विशतकांसह त्याने ३१ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. 

वनडे फॉरमॅटमध्ये विराट कोहलीने ५८.१८ च्या सरासरीने १३९०६ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीने ५० शतके आणि ७२ अर्धशतके आहेत. यासोबतच विराट कोहलीने भारतासाठी टी-20 सामन्यांमध्ये १३७ च्या स्ट्राइक रेटने आणि ४८ च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या