टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतात परतली. दिल्ली विमानतळापासून हॉटेल आयटीसी मौर्यापर्यंत क्रिकेट चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू भांगडा करताना दिसले. यानंतर टीम इंडिया खास जर्सी घालून पीएम हाऊसमध्ये पोहोचली, जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांच्या भेटीनंतर विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे, “आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटून खूप अभिमान वाटला. आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सर.”
विराटने पीएम मोदींना टॅग केले. काही वेळातच हे फोटो तुफान व्हायरल होऊ झाले.
टी-20 चॅम्पियन टीम इंडिया आज बार्बाडोसहून भारतात परतली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर रिमझिम पाऊस आणि कडक सुरक्षा असतानाही हजारो चाहत्यांनी टीम इंडियाचे भव्य स्वागत केले.
दिल्लीत सकाळी प्रतिकूल हवामान असूनही, चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी विमानतळाबाहेर छत्री घेऊन आणि राष्ट्रध्वज फडकावत रांगेत उभे होते.
दरम्यान, टीम इंडिया आता दुपारी ४ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचेल. यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान, टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल. संध्याकाळी ५ ते ७ पर्यत दोन तास ही मिरवणूक चालणार आहे. या विजयी मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये एक विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
टीम इंडियाची मिरवणूक ज्या बसवरून निघणार आहे, त्या ओपन बसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बस पूर्ण निळ्या रंगाची आहे. त्या बसवर टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आनंद साजरा केला, त्याचा फोटो आहे. बसच्या समोर चॅम्पियन्स २०२४ असे लिहिलेले आहे.
संबंधित बातम्या