Virat Kohli : विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती लाख रूपये खर्च करतो? आकडा ऐकून धक्का बसेल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती लाख रूपये खर्च करतो? आकडा ऐकून धक्का बसेल

Virat Kohli : विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती लाख रूपये खर्च करतो? आकडा ऐकून धक्का बसेल

Published Apr 07, 2024 05:04 PM IST

Virat Kohli Haircut Cost : नुकतीच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामध्ये विराट कोहलीने रशीद सलामानीला त्याच्या नवीन हेअरस्टाइलसाठी ८० हजार रुपये दिल्याचे म्हटले होते.

Virat Kohli Haircut Cost विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती लाख रूपये खर्च करतो? आकडा ऐकून धक्का बसेल
Virat Kohli Haircut Cost विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती लाख रूपये खर्च करतो? आकडा ऐकून धक्का बसेल

virat kohli hair cutting : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीची जगभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आपल्या खेळासोबतच विराट त्याच्या अलीशान लाईफस्टाईलमुळेही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. अशातच विराटबाबत एक माहिती समोर आली आहे. विराट कोहली केस कापण्यासाठी किती खर्च करतो हे तुम्हाला माहीत आहे का? 

खरं तर, विराट हेअर कटिंगसाठी किती पैसे खर्च करतो हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली हेअर कटिंगसाठी किमान १ लाख रुपये खर्च करतो.

विराट कोहली हेअर कटिंगसाठी किती पैसे खर्च करतो

नुकतीच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामध्ये विराट कोहलीने रशीद सलामानीला त्याच्या नवीन हेअरस्टाइलसाठी ८० हजार रुपये दिल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, आता अलीम हकीमच्या हवाल्याने असा दावा केला जात आहे की विराट कोहली केस कापण्यासाठी किमान एक लाख रुपये देतो.

दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की विराट कोहली एका वेळी हेअर कटिंगसाठी किमान १ लाख रुपये खर्च करतो.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोहली आघाडीवर 

ऑरेंज कॅपच्या बाबतीत विराट कोहली आघाडीवर आहे. विराटने ५ सामन्यात १०५.३३ च्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. यात त्याने २ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.

तर रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे. रियान परागने ४ सामन्यात १८५ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन ४ सामन्यात १७८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेनरिक क्लासेन ४ सामन्यांत १७७ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत विराट या शर्यतीत खूप पुढे गेला आहे.

IPL २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली - ५ सामने - ३१६ धावा

रियान पराग - ४ सामने - १८५ धावा

संजू सॅमसन - ४ सामने - १७८ धावा

हेनरिक क्लासेन - ४ सामने - १७७ धावा

शुभमन गिल - ४ सामने - १६४ धावा

Whats_app_banner

संबंधित बातम्या