मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RCB : मुंबईच्या ८ षटकात १०० धावा… नंतर विराटनं रोहितला डिवचलं? वानखेडेवर नेमकं काय घडलं? पाहा

MI vs RCB : मुंबईच्या ८ षटकात १०० धावा… नंतर विराटनं रोहितला डिवचलं? वानखेडेवर नेमकं काय घडलं? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 12, 2024 02:45 PM IST

Virat Kohli Rohit Sharma Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली चांगल्या लयीत फलंदाजी करत असलेल्या रोहित शर्माला स्लेज करताना दिसत आहे.

Virat Kohli Rohit Sharma Video विराटनं रोहितला डिवचलं? वानखेडेवर नेमकं काय घडलं? पाहा
Virat Kohli Rohit Sharma Video विराटनं रोहितला डिवचलं? वानखेडेवर नेमकं काय घडलं? पाहा

MI vs RCB IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्यांनी सुरुवातीचे सलग तीन सामने गमावले होते. पण आता मुंबईचा संघ विजयाच्या ट्रॅकवर आला आहे. लीगच्या २५व्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. या हंगामातील मुंबईचा हा सलग दुसरा विजय आहे. दोन सामने जिंकले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघाने कर्णधार फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात १९६ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देण्यासाठी इशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला आले. त्यांनी अवघ्या ८ षटकात १०० धावा ठोकल्या. तर १५.३ षटकात सामना जिंकला.

इशान आणि रोहित यांनी मिळून आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. लक्ष्याचा बचाव करताना आरसीबीची अवस्था अतिशय वाईट होती. मात्र असे असतानाही आरसीबीचा विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली चांगल्या लयीत फलंदाजी करत असलेल्या रोहित शर्माला स्लेज करताना दिसत आहे.

दरम्यान, मुंबईविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली फलंदाजीत काही विशेष दाखवू शकला नाही. विराट कोहलीला जसप्रीत बुमराहने बाद केले. विराटला ९ चेंडूत केवळ ३ धावा करता आल्या. याआधीच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट शतक झळकावले होते, पण तरीही आरसीबीला विजय मिळवता आला नव्हता. आता मुंबईविरुद्धही त्यांचा पराभव झाला आहे.

मुंबई इंडियन्स सातव्या स्थानावर

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांनी पहिले ३ सामने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. आता त्यांनी सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्लीला पराभूत केल्यानंतर, मुंबईने गुरुवारी आयपीएल २०२४ च्या २५ व्या सामन्यात आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला.

आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स आता सातव्या स्थानावर पोहोचली आहे. आरसीबीचा ६ सामन्यांमधला हा पाचवा पराभव असून ते पॉइंट टेबलमध्ये ९व्या स्थानावर आहेत.

IPL_Entry_Point