विराटकडून आकाशदीपला मिळाली खास भेट, गिफ्टचा फोटो व्हायरल, 'या' कारणामुळे दिलं बक्षीस, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विराटकडून आकाशदीपला मिळाली खास भेट, गिफ्टचा फोटो व्हायरल, 'या' कारणामुळे दिलं बक्षीस, पाहा

विराटकडून आकाशदीपला मिळाली खास भेट, गिफ्टचा फोटो व्हायरल, 'या' कारणामुळे दिलं बक्षीस, पाहा

Updated Sep 16, 2024 06:04 PM IST

Virat Kohli Gifts Bat Aakash Deep : आकाश दीपने इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या बॅटचा 'MRF' स्टिकर असलेला फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, विराट भाई धन्यवाद.

विराटकडून आकाशदीपला मिळाली खास भेट, गिफ्टचा फोटो व्हायरल, दुलीप ट्रॉफीत ९ विकेट घेतल्याने दिलं बक्षीस, पाहा
विराटकडून आकाशदीपला मिळाली खास भेट, गिफ्टचा फोटो व्हायरल, दुलीप ट्रॉफीत ९ विकेट घेतल्याने दिलं बक्षीस, पाहा

टीम इंडियाचा महान फलंदाज आणि सुपस्टार विराट कोहली मैदानावर खूप आक्रमक असतोय पण मैदानाबाहेर त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळे असते. विराट कोहलीने आपला सहकारी क्रिकेटपटू आकाश दीप याला बॅट गिफ्ट दिली आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.

भारत आणि बांगलादेश कसोटी मालिका काही दिवसात सुरू होणार आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज आकाश दीप याचीही निवड करण्यात आली आहे. पण ही मालिका सुरू होण्याच्या आधी विराटकडून अशी भेट मिळाल्याने आकाशचे मनोबल वाढले असेल.

उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आकाश दीपने इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या बॅटचा 'MRF' स्टिकर असलेला फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, विराट भाई धन्यवाद.

काही काळापूर्वी विराट कोहली हा रिंकू सिंगला बॅट दिल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. याशिवाय 'किंग कोहली' अनेक क्रिकेटपटूंना आपली बॅट भेट देत असतो. आकाशला भेट म्हणून मिळालेली बॅट ही खूप खास आहे. कारण विराटने या बॅटने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.

आकाशदीपची दुलीप ट्रॉफीमध्ये चमत्कारिक कामगिरी

बांगलादेश मालिकेसाठी निवड होण्याआधी आकाश दीप दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत होता आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली तो भारत अ संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, मात्र पहिल्याच सामन्यात त्याने ९ विकेट घेत खळबळ उडवून दिली होती. त्यांचा भारत अ संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

आकाशदीपच्या या कामगिरीनंतर त्याला बांगालदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईत होणार आहे.

आकाश दीपने ३२ सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आतापर्यंत ११६ विकेट घेतल्या आहेत. त्याच वर्षी त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण केले. त्या सामन्यात आकाशने ३ बळी घेतले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या