टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांची नुकतीच एक मुलाखत झाली. यामध्ये दोघेही सहभागी झाले होते. यादरम्यान विराट आणि गंभीरने त्यांच्या करिअरशी संबंधित अनेक जुन्या गोष्टींचा उल्लेख केला.
विराटने सांगितले की, तो खूप आध्यात्मिक आहे. गंभीरनेही असाच उल्लेख केला. या मुलाखतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचाही उल्लेख झाला.
मुलाखतीच्या शेवटी गंभीरने सांगितले की, पुढचा पाहुणा रोहित असेल, त्याच्यासाठी तुझा काही प्रश्न आहे का? यावर विराटने एक मजेशीर गोष्ट सांगितली.
वास्तविक, गंभीर आणि विराट बीसीसीआय टीव्हीवर एकत्र आले होते. गंभीरने विराटला त्याच्या कारकिर्दीबाबत अनेक रोचक प्रश्न विचारले. यादरम्यान विश्वचषकाचाही उल्लेख करण्यात आला. यानंतर गंभीरने विराटला सांगितले की, पुढचा पाहुणा रोहित असेल.
तुला त्याच्यासाठी काही प्रश्न आहेत का? यावर विराटने उत्तर दिले, तो म्हणाला की "माझ्या मते, तु सकाळी भिजवलेले बदाम खातोस की नाही? हा त्याच्यासाठी एक अतिशय सोपा प्रश्न असेल."
यावर गंभीर म्हणाला, "हो म्हणजेच, त्याला (रोहित) हे लक्षात राहील की सकाळी ११ वाजता यायचे आहे, ना की रात्रीच्या ११ वाजता'.
गंभीर आणि विराटमधील वादाच्या अनेक बातम्या येत असतात. दोघेही आयपीएलमध्ये एकमेकांशी भिडले होते. या प्रकरणाने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली होती. गंभीर आणि विराटचे चाहतेही सोशल मीडियावर भिडले होते.
पण आता दोघांचे बॉन्डिंग चांगलेच झाले आहे. बीसीसीआयच्या मुलाखतीतही हे दिसून आले. दोघेही अनेक गोष्टींवर हसताना दिसले. रोहितचा उल्लेखाने दोघांना हसू आलं आणि वातावरणही बदललं.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चेन्नईत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना येथे खेळला जात आहे. मुख्य प्रशिक्षक गंभीरची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. यापूर्वी तो वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता.