Virat Kohli : विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा

Virat Kohli : विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा

Nov 03, 2024 11:37 AM IST

Virat Kohli Ind vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावातही कोहलीची बॅट शांत राहिली.

Virat Kohli : विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा
Virat Kohli : विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातही चाहत्यांची निराशा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच आहे. मुंबई कसोटीतही तो पहिल्या डावात कोहली केवळ ४ धावा करून धावबाद झाला होता, त्यानंतर आता दुसऱ्या डावात कोहलीच्या फलंदाजीतून चांगली खेळी पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा होती. पण तो आजही फ्लॉप झाला.

मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहली केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी फिरकीपटू एजाज पटेलच्या चेंडूचा बचाव करताना कोहलीने स्लिपमध्ये डॅरिल मिशेलकडे झेलबाद केले.

कोहलीचा फ्लॉप शो बऱ्याच दिवसांपासून सुरू 

हे केवळ मुंबई कसोटीचे नाही, तर विराट कोहलीचा फ्लॉप शो गेल्या काही काळापासून सातत्याने पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीतही कोहली पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूमध्ये खेळला गेला. या सामन्यात कोहली पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने ७० धावा केल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटीत कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात १ धाव काढली तर दुसऱ्या डावात त्याला केवळ १७ धावा करता आल्या. त्याचप्रमाणे मुंबई कसोटीच्या दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून ४ आणि १ धावा आल्या.

बांगलादेश मालिकेतही कोहली फ्लॉप 

न्यूझीलंडपूर्वी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने दोन्ही डावात ६ आणि १७ धावा केल्या. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने ४७ आणि २९* धावा केल्या होत्या, पण त्याला अर्धशतकही गाठता आले नाही.

Whats_app_banner