मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : कोहलीच्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण? व्हिडीओ व्हायरल

Viral Video : कोहलीच्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण? व्हिडीओ व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 27, 2024 06:15 PM IST

virat kohli fan beaten by security guards : आयपीएलमधील पंजाब आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही सुरक्षा एका व्यक्तीला मारहणा करत असल्याचे दिसत आहे.

virat kohli fan beaten by security guards कोहलीच्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांकडून लाथा -बुक्क्यांनी मारहाण? व्हिडीओ व्हायरल
virat kohli fan beaten by security guards कोहलीच्या चाहत्याला सुरक्षा रक्षकांकडून लाथा -बुक्क्यांनी मारहाण? व्हिडीओ व्हायरल

आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना ४ विकेटने जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहलीने ७७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.

एकीकडे विराटच्या या खेळीची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुरक्षा रक्षक कोहलीच्या एका चाहत्याला जबर मारहाण करताना दिसत आहेत.

वास्तविक, बेंगळुरू (RCB) मंगळवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. सामन्यादरम्यान विराट कोहलीचा एक चाहता सुरक्षा तोडून खेळपट्टीवर पोहोचला. चाहत्याने विराटच्या पायाला स्पर्श केला आणि त्याला मिठीही मारली. यामुळे सामना काही काळ थांबला होता.

सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला मैदानातून बाहेर काढले. यानंतर आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, सेक्युरिटी गार्डसनी मैदानाबाहेर नेल्यानंतर त्या चाहत्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत

या व्हिडिओमध्ये प्रथम विराटसोबत खेळपट्टीवर भेट झाल्याचे दृश्य दिसते, त्यानंतर काही सुरक्षा रक्षक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.

पण व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण केली जात आहे, हा तोच व्यक्ती आहे, जो विराटला मैदानात भेटला होता, असा दावा हिंदूस्तान टाइम्स मराठी करत नाही.

मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीवर बरीच टीका होत आहे.

सामन्यात काय घडलं?

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर आरसीबीकडून सिराज आणि मॅक्सवेलला प्रत्येकी २ बळी मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर बेंगळुरूने विजय मिळवला. पंजाब किंग्जकडून रबाडा आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

IPL_Entry_Point