टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला तुम्ही अनेकदा मैदानावर डान्स करताना पाहिलं असेल. क्षेत्ररक्षण करताना कोहली स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी नेहमी डान्स करताना दिसतो.
पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विराट त्याची आई सरोज कोहली यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. कोहलीचा त्याच्या आईसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ हृदयाला भिडणारा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर दिल्लीत झालेल्या रिसेप्शनचा आहे. विराट कोहलीने डिसेंबर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. लग्नानंतर तत्कालीन भारतीय कर्णधाराने दिल्लीत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते.
व्हिडिओमध्ये कोहली पंजाबी गाण्यावर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. डान्स करताना तो त्याची आई सरोज कोहलीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर किंग कोहली त्याच्या आईला डान्ससाठी घेऊन जातो. पण आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांंना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाला जवळपास ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. दोघांना एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलीचे नाव 'वामिका' आणि मुलाचे नाव 'अकाय' आहे.
विराट आणि अनुष्का १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसऱ्यांदा पालक झाले. त्यावेळी अनुष्का पुन्हा आई झाल्याची बातमी लंडनमधून आली होती. तेव्हापासून कोहलीही तिच्यासोबत लंडनमध्ये राहत असल्याच्या बातम्य येत असतात. अवृत्तांवर विश्वास ठेवला तर कोहली आता फक्त मायदेशातील मालिका खेळण्यासाठी लंडनहून भारतात येतो. कोहली लंडनमध्येही अनेकदा स्पॉट झाला आहे. मात्र, कोहली आणि अनुष्काच्या लंडनमध्ये राहण्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.