Virat Kohli Century : जयपूरमध्ये विराट कोहलीचं वादळ, राजस्थानविरुद्ध झळकावलं शानदार शतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Century : जयपूरमध्ये विराट कोहलीचं वादळ, राजस्थानविरुद्ध झळकावलं शानदार शतक

Virat Kohli Century : जयपूरमध्ये विराट कोहलीचं वादळ, राजस्थानविरुद्ध झळकावलं शानदार शतक

Apr 06, 2024 09:06 PM IST

virat kohli century vs rajsthan royals : आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान आणि आरसीबी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे.

virat kohli century vs rajsthan royals
virat kohli century vs rajsthan royals (PTI)

virat kohli century vs rajsthan royals highlights : आयपीएल २०२४ चा १९वा सामना आज  (६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहलीने शतक झळकावले आहे.

आयपीएलच्या या मोसमातील हे पहिलेच शतक आहे. कोहलीने ६७ चेंडूत आयपीएल करिअरमधील आठवे शतक पूर्ण केले. कोहलीने ७२ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११३ धावा केल्या. कोहलीने या खेळीत १२ चौकार आणि ४ षटकार मारले.

कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, त्याने ६ शतके झळकावली होती.

सोबतच कोहलीने या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ७,५०० धावाही पूर्ण केल्या आणि आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

कोहली-डुप्लेसिसची शतकी भागिदारी

या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आरसीबीसाठी डावाची सुरुवात केली. आरसीबी मोठ्या भागीदारींसाठी ओळखला जातो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट आणि डु प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली.

आरसीबीच्या १८३ धावा

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने शानदार शतकी भागीदारी करून सॅमसनचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ३ बाद १८३ धावा केल्या. राजस्थानकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४ षटकांत ३४ धावा देत २ बळी घेतले.

तर नांद्रे बर्गरने ४ षटकांत ३३ धावांत १ बळी घेतला. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. आवेश खान चांगलाच महागात पडला. त्याने ४ षटकात ४६ धावा दिल्या.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट सब: रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग

Whats_app_banner

संबंधित बातम्या