मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video: हुबेहूब शिखर धवनसारख्या दिसणाऱ्या प्रेक्षकाला पाहून विराट कोहली शॉक!

Viral Video: हुबेहूब शिखर धवनसारख्या दिसणाऱ्या प्रेक्षकाला पाहून विराट कोहली शॉक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 25, 2024 10:42 PM IST

Virat Kohli on Shikhar Dhawan's Doppelganger: हुबेहूब शिखर धवनसारखा दिसणाऱ्या प्रेक्षकाला पाहून विराट कोहली शॉक झाला.

Virat Kohli reacts to Shikhar Dhawan's doppelganger.
Virat Kohli reacts to Shikhar Dhawan's doppelganger.

आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबने बंगळुरुसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाब किंग्जच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीने हुबेहूब पंजाबचा कर्णधार शिखर धवनसारखा दिसणाऱ्या प्रेक्षकाला पाहिले. त्यानंतर काही क्षणाकरीता तो शॉक झाला.

हा प्रकार पंजाब किंग्जच्या डावातील १८ व्या षटकात घडला, जेव्हा कोहली बाऊंड्रीजवळ चालत. तेव्हा कॅमेरामॅनने शिखर धवनसारख्या दिसणाऱ्या प्रेक्षकाकडे कॅमेरा फिरवला. त्यानंतर मैदानातील स्क्रीनमध्ये त्याला पाहून विराट कोहली शॉक झाला.  त्याने पीबीकेएसची जर्सी परिधान केली होती आणि तो धवनसारखा दिसत होता. हा चाहता धवन नसून डोपलेगर आहे, हे लक्षात येताच आरसीबीचा माजी कर्णधार अवाक झाला.

 

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला (८ धाव) लवकर गमावून पीबीकेएसची सुरुवात डगमगीत झाली. पण बेअरस्टोचा सलामीचा जोडीदार धवनने प्रभसिमरन सिंगच्या साथीने डावात स्थिरता आणली. धवनने ३७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावांची खेळी केली. प्रभसिमरनने १७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावा केल्या.

दरम्यान, सॅम करन (२३ धावा), जितेश शर्मा (२७ धावा) आणि शशांक सिंग (नाबाद २१ धावा) यांनी उल्लेखनीय योगदान दिल्याने पीबीकेएसने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७६ धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

पीबीकेएसच्या खेळीनंतर बोलताना अष्टपैलू सॅम करन म्हणाला की, "हे कदाचित थोड्या कमी धावा आहेत. पण आमच्याकडे असे गोलंदाज आहेत, जे सुरुवातील आम्हाला विकेट्स मिळवून देऊ शकतात. त्यांनी नव्या चेंडूने खरोखरच गोलंदाजी केली आहे. १७७ धावांचे लक्ष्य रोखण्यासाठी आम्ही नव्या प्लॅनसह मैदानात उतरत आहेत.

IPL_Entry_Point