IND vs BAN 2nd Test : विराट कोहली कानपूरमध्ये इतिहास रचणार! ग्रीन पार्कवर होणार हे दोन महाविक्रम?-virat kohli can complete 9000 test runs in kapanur ind vs ban 2nd test ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN 2nd Test : विराट कोहली कानपूरमध्ये इतिहास रचणार! ग्रीन पार्कवर होणार हे दोन महाविक्रम?

IND vs BAN 2nd Test : विराट कोहली कानपूरमध्ये इतिहास रचणार! ग्रीन पार्कवर होणार हे दोन महाविक्रम?

Sep 23, 2024 09:14 PM IST

IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली कानपूरच्या ग्रीन पार्कवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम रचू शकतो. १२९ धावा करून तो ९ हजार कसोटी धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल.

IND vs BAN 2nd Test : विराट कोहली कानपूरमध्ये इतिहास रचणार! ग्रीन पार्कवर होणार हे दोन महाविक्रम?
IND vs BAN 2nd Test : विराट कोहली कानपूरमध्ये इतिहास रचणार! ग्रीन पार्कवर होणार हे दोन महाविक्रम? (PTI)

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. यानंत दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली कानपूरच्या ग्रीन पार्कवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम रचू शकतो. १२९ धावा करून तो ९ हजार कसोटी धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल. तर, विराट १००० चौकार मारण्यापासून ७ पावले दूर आहे.

ग्रीन पार्कमध्ये विराट ५ वेळा खेळला आहे

किंग कोहली याआधी पाच वेळा ग्रीन पार्कवर खेळला आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या ११४ कसोटी सामन्यांमध्ये ८८७१ धावा केल्या आहेत. १२९ धावा करताच तो ९ हजार धावा करणारा खेळाडू बनेल. तो महान इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहम गूचच्या ८९०० धावांपेक्षा फक्त १२९ धावांनी मागे आहे. याशिवाय तो एक हजार चौकार ठोकण्यापासून फक्त सात चौकार दूर आहे, त्याने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत ९९३ चौकार मारले आहेत.

विराट कोहली चेन्नईत फ्लॉप ठरला

ग्रीन पार्क येथे होणारा कसोटी सामना अनेक अर्थाने रेकॉर्डब्रेकर ठरणार आहे. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराटच्या फ्लॉप शोनंतर आता दुसऱ्या कसोटीतही क्रिकेटप्रेमींना त्याच्या शानदार खेळीची अपेक्षा असेल. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १७ खेळाडू ९ हजार धावांच्या क्लबमध्ये सामील आहेत.

सचिन आणि राहुलच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी

यानंतर आता विराट जगातील ९ हजार धावा करणारा १८ वा खेळाडू बनू शकतो. भारताकडून सचिन, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी कसोटीत १० हजार धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  त्याचबरोबर १००० चौकारांबद्दल बोलायचे झाले तर, या क्लबमध्ये विराटच्या आधी सचिन, राहुल, सेहवाग आणि लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

Whats_app_banner