ind vs sl : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित इतिहास रचणार, रो-कोच्या निशाण्यावर हे महाविक्रम, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ind vs sl : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित इतिहास रचणार, रो-कोच्या निशाण्यावर हे महाविक्रम, पाहा

ind vs sl : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित इतिहास रचणार, रो-कोच्या निशाण्यावर हे महाविक्रम, पाहा

Jul 31, 2024 09:55 PM IST

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका २ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीही पुनरागमन करत आहेत. हे दोन्ही दिग्गज श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत इतिहास रचू शकतात.

ind vs sl : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित इतिहास रचणार, रोकोच्या निशाण्यावर हे महाविक्रम, पाहा
ind vs sl : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित इतिहास रचणार, रोकोच्या निशाण्यावर हे महाविक्रम, पाहा (PTI)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका २ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीही पुनरागमन करत आहेत. T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावल्यानंतर या दोन्ही दिग्गजांनी या फॉरमॅटला अलविदा केला होता.

आता हे दोन्ही दिग्गज श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये दिसणार आहेत. विराट कोहलीला या मालिकेत इतिहास रचण्याची संधी आहे, तर रोहित शर्मा राहुल द्रविडला मागे टाकून वनडेत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनू शकतो.

एकदिवसीय सामन्यातील कोहलीची आकडेवारी

विराट कोहलीने आतापर्यंत २९२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने २८० डावांमध्ये ५८.६७ च्या सरासरीने आणि ९३.५८ च्या स्ट्राईक रेटने १३८४८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १५२ धावा करून, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावा करणारा दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरेल. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

वनडेत सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर: १८४२६ धावा

कुमार संगाकर: १४२३४ धावा

विराट कोहली: १३८४८ धावा

रिकी पाँटिंग : १३७०४ धावा

सनथ जयसूर्या : १३४३० धावा

रोहितच्या निशाण्यावर द्रविडचा विक्रम

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत खेळलेल्या २६२ एकदिवसीय सामन्यांच्या २५४ डावांमध्ये ४९.१२ च्या सरासरीने आणि ९१.९७ च्या स्ट्राईक रेटने १०७०९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ६० धावा केल्यानंतर, तो राहुल द्रविडला मागे टाकेल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

सचिन तेंडुलकर: १८४२६ धावा

विराट कोहली: १३८४८ धावा

सौरव गांगुली: ११२२१ धावा

राहुल द्रविड: १०७६८ धावा

रोहित शर्मा: १०७०९ धावा

Whats_app_banner

संबंधित बातम्या