मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli Record : कोहलीने डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला, आता रोहित शर्माचा रेकॉर्ड धोक्यात, जाणून घ्या

Virat Kohli Record : कोहलीने डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला, आता रोहित शर्माचा रेकॉर्ड धोक्यात, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 29, 2024 03:38 PM IST

Virat Kohli Record IPL : विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा खास विक्रम मोडला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीने हा विक्रम मोडला.

Virat Kohli Record : कोहलीने डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला, आता रोहित शर्माचा रेकॉर्ड धोक्यात, जाणून घ्या
Virat Kohli Record : कोहलीने डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला, आता रोहित शर्माचा रेकॉर्ड धोक्यात, जाणून घ्या (AFP)

आयपीएल २०२४ च्या ४५ व्या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहलीने शानदार खेळी खेळली. गुजरात टायटन्सविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. आता या नाबाद खेळीसह विराट कोहलीने बेंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खरं तर गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने षटकारांच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. कोहलीने आता आयपीएलमध्ये २५४ षटकार पूर्ण केले आहेत. डिव्हिलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २५१ षटकार ठोकले होते.

या यादीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा २७५ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत कोहलीही त्याचा विक्रम मोडू शकतो. या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३५७ षटकार ठोकले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

ख्रिस गेल- ३५७ षटकार

रोहित शर्मा- २७५ षटकार

विराट कोहली- २५४ षटकार

एबी डिव्हिलियर्स- २५१ षटकार

एमएस धोनी- २४७ षटकार.

कोहलीच्या आयपीएल २०२४ मध्ये ५०० धावा पूर्ण

विराट कोहलीने IPL २०२४ मध्ये ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. चालू मोसमात हा आकडा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत किंग कोहलीने १० सामन्यांच्या १० डावात ७१.४३ च्या सरासरीने आणि १४७.४९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ५०० धावा केल्या आहेत.

आरसीबीची अवस्था वाईट

गुजरातविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. बंगळुरूने आतापर्यंत या मोसमात १० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी केवळ ३ जिंकले आहेत आणि ७ गमावले आहेत.

३ सामन्यांमध्ये आरसीबीने पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. संघाचे ६ गुण आणि नेटरनरेट -०.४१५ आहे. मात्र, अद्याप संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही.

IPL_Entry_Point