विराट कोहलीनं सर्वात कमी डाव खेळून पूर्ण केल्या २७ हजार धावा, सचिन-पॉंटिंगला किती सामने लागले? पाहा-virat kohli breaks fastest 27000 runs international cricketsachin tendulkar during ind vs ban 2nd test day 4 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विराट कोहलीनं सर्वात कमी डाव खेळून पूर्ण केल्या २७ हजार धावा, सचिन-पॉंटिंगला किती सामने लागले? पाहा

विराट कोहलीनं सर्वात कमी डाव खेळून पूर्ण केल्या २७ हजार धावा, सचिन-पॉंटिंगला किती सामने लागले? पाहा

Sep 30, 2024 06:14 PM IST

Virat Kohli Completes 27000 International Runs : विराट कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८,९१८ धावा केल्या आहेत.

विराट कोहलीनं सर्वात कमी डाव खेळून पूर्ण केल्या २७ हजार धावा, सचिन-पॉंटिंगला किती सामने लागले? पाहा
विराट कोहलीनं सर्वात कमी डाव खेळून पूर्ण केल्या २७ हजार धावा, सचिन-पॉंटिंगला किती सामने लागले? पाहा (AP)

भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे कसोटी सामना खेळला जात आहे. आज (३० सप्टेंबर) सामन्याचा चौथ्या दिवशी टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याला एका खास विक्रमात मागे टाकले.

वास्तविक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करणारा विराट कोहली जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने ३५ धावा करताच हा आकडा गाठला आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्य यादीत कोहलीच्या पुढे आता फक्त रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर हेच आहेत. कानपूर कसोटीत फलंदाजी करण्यापूर्वी कोहलीने ५९३ डावात २६,९६५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ३५ चेंडूत ४७ धावा केल्या, मात्र तो शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

सचिन तेंडुलकरला मागे टाकले

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. २००७ साली सचिनने कारकिर्दीतील ६२३ व्या इनिंगमध्ये २७ हजार धावांचा आकडा पार केला होता. मात्र कोहलीने त्याच्यापेक्षा २९ डाव कमी खेळून ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, संगकाराने २७ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ६४८ डाव खेळले होते, तर पाँटिंगने आपल्या ६५० व्या डावात इतक्या धावा पूर्ण केल्या होत्या.

सर्वात जलद २७ हजार धावा करणारे फलंदाज

विराट कोहली - ५९४ डाव

सचिन तेंडुलकर - ६२३ डाव

कुमार संगकारा - ६४८ डाव

रिकी पाँटिंग - ६५० डाव

विराट कोहलीची चमकदार कारकीर्द

विराट कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ८,९१८ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या अनुक्रमे १३,९०६ धावा आणि ४,१८८ धावा आहेत. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७,०१२ धावा केल्या आहेत.

आणखी ४७१ धावा केल्यानंतर कोहली सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकेल. शतकांबद्दल बोलायचे झाले तर कोहली अजूनही दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८० शतके झळकावली असून या यादीत सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

Whats_app_banner