भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आता चांगले मित्र आहेत. पण त्यांचे संबंध आधी चांगले नव्हते. दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. मात्र, एक वेळ अशी होती जेव्हा कोहलीने मॅक्सवेलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. या अष्टपैलू खेळाडूच्या एका कृतीमुळे कोहली प्रचंड संतापला होता. खुद्द मॅक्सवेलने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
विराट कोहलीने आधी मॅक्सवेलला ब्लॉक केले होते आणि नंतर दोघेही चांगले मित्र बनले. कोहलीने त्याला का ब्लॉक केले आणि मग दोघे जवळचे मित्र कसे बनले याची संपूर्ण स्टोरी स्वतः मॅक्सवेलने सांगितली आहे.
खरे तर २०१७ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने विराट कोहलीची नक्कल केली होती. कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यावेळी मॅक्सवेलने खांदा धरून कोहलीच्यादुखापतीची खिल्ली उडवली होती. यानंतरच कोहलीने मॅक्सवेलला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले.
LiSTNR स्पोर्ट पॉडकास्टवर बोलताना मॅक्सवेल म्हणाला, की RCB मध्ये आल्यानंतर त्याला कळले की कोहलीने त्याला Instagram वर ब्लॉक केले आहे. मॅक्सवेल २०२१ मध्ये आरसीबीमध्ये दाखल झाला. आता कोहली आणि मॅक्सवेलने आयपीएलचे चार सीझन एकत्र खेळले आहेत.
वास्तविक, रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा मॅक्सवेलने खांदा धरून कोहलीची नक्कल केली. यानंतर कोहलीने मॅक्सवेलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले. मात्र, नंतर कोहलीने ऑस्ट्रेलियन पॉवर हिटरला आरसीबीमध्ये सामावून घेण्याचे समर्थन केले.
लिस्टएनआर स्पोर्ट पॉडकास्टवर या अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, जेव्हा मला कळले की मी आरसीबीला जात आहे, तेव्हा विराटने सर्वप्रथम मला मेसेज केला आणि संघात माझे स्वागत केले. जेव्हा मी आयपीएलपूर्व सराव शिबिरासाठी आलो तेव्हा आम्ही गप्पा मारल्या आणि एकत्र सराव करण्यासाठी बराच वेळ घालवला. जेव्हा मी कोहलीला सोशल मीडियावर फॉलो करायला गेलो तेव्हा, मला कोहलीचे अकाउंट सापडत नव्हते.
मॅक्सवेल पुढे म्हणाला, मला खात्री होती की विराट कुठेतरी सोशल मीडियावर असेल. त्यामुळे मी त्याबद्दल जास्त काहीच विचार केला नाही. त्याला इन्स्टाग्रामबद्दल माहिती नाही असे नाही. मला समजत नाही की मी त्याला फॉलो का करू शकत नाही. तेव्हा कोणीतरी सांगितले की त्याने तुला ब्लॉक केले असावे.
"मग मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारले की तु मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले आहे का? आणि तो म्हणाला, 'हो, कदाचित.' त्या टेस्ट मॅचमध्ये तुम्ही माझी चेष्टा केली तेव्हा मी तुला ्ब्लॉक केले. यानंतर कोहलीने मला अनब्लॉक केले आणि त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो.
संबंधित बातम्या