Navjot Singh Sidhu: भारताचा माजी क्रिकेटस्टार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्यापेक्षा विराट कोहली सरस आहे, असे मत भारताचे माजी फलंदाज नवज्योत सिंह सिद्धू यांनी व्यक्त केले. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वी सिद्धू यांनी हे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण येणार हे निश्चित आहे. गेल्या काही वर्षांत भारताला उत्कृष्ट खेळाडू लाभले आहेत. या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण आहे? याची निवड करणे अत्यंत कठीण झाले आहे.
विराट कोहली सर्वोत्तम का आहे हे? सिद्धू यांनी स्पष्ट केले. विराट कोहलीने तिन्ही फॉरमेटमध्ये भारतीय संघाने नेतृत्त्व केले आहे, जे सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांना करावे लागले नाही. यामुळे सिद्धू विराटला सर्वोत्तम मानतात. सिद्धू म्हणाले की,"मी विराटला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाज मानले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुनील गावस्कर यांची फलंदाजी ऐकण्यासाठी मी माझे ट्रान्झिस्टर लावून ऐकत असे. सुनील गावस्कर यांनी १५-२० वर्षे त्यांनी वर्चस्व गाजवले. त्यानंतर तेंडुलकर आले, आणखी एक युग. त्यानंतर धोनी आला आणि मग विराट आला. या चौघांमध्ये मी विराटला सर्वोत्तम मानतो" असे सिद्धू यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.
कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात विजय हजारे, पॉली उमरीगर आणि विनू मांकड यांनी भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत वर्चस्व गाजवले. त्यानंतर सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजाला वेगळ्या उंचीवर नेले. सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतकांसह १० हजारांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकटेमध्ये १० हजारांचा टप्पा गाठणारे सुनील गावस्कर पहिले क्रिकेटपटू ठरले.
सुनील गावस्कर यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागल्यानंतर सचिन तेंडुलकर नावाच्या क्रिकेटपटूने संपूर्ण जगाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले.सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील भारताचा पहिला जागतिक सुपरस्टार बनला आणि रंगीत दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला. सचिन तेंडुलकरने त्याच्या बॅटीने प्रत्यके गोलंदाजाच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतले. २०० कसोटी सामने खेळणारा पहिला, वनडेत १० हजार धावा करणारा पहिला, कसोटीत १५ हजार धावा करणारा पहिला, १०० शतके ठोकणारा एकमेव, एकदिवसीय द्विशतक झळकावणारा पहिला, असे अनेक विशाल विक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताला विराट कोहलीच्या रूपात आणखी एक दिग्गज स्टार मिळाला, ज्याची क्रिकेट विश्वाने कल्पनाच केली नव्हती.त्याने एकापाठोपाठ एक तेंडुलकरचे विक्रम मोडले.