IND vs NZ : विराटसाठी कसोटीत तीन नंबर अनलकी, शुन्यावर बाद होऊन केला नकोसा विक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs NZ : विराटसाठी कसोटीत तीन नंबर अनलकी, शुन्यावर बाद होऊन केला नकोसा विक्रम

IND vs NZ : विराटसाठी कसोटीत तीन नंबर अनलकी, शुन्यावर बाद होऊन केला नकोसा विक्रम

Published Oct 17, 2024 01:57 PM IST

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. शुभमन गिल या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत कोहलीला नंबर तीनवर फलंदाजी करावी लागली.

IND vs NZ : विराटसाठी कसोटीत तीन नंबर अनलकी, शुन्यावर बाद होऊन केला नकोसा विक्रम
IND vs NZ : विराटसाठी कसोटीत तीन नंबर अनलकी, शुन्यावर बाद होऊन केला नकोसा विक्रम (PTI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय चांगलाच अंगलट आला आणि संपूर्ण टीम इंडिया अवघ्या ४६ धावांवर गारद झाली.

या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. अशा स्थितीत आज दुसऱ्या दिवशी टॉस जिंकून भारत प्रथम फलंदाजीला आला. भारताची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे टॉप तीन फलंदाज अवघ्या ९ धावांवर तंबूत परतले होते. यानंतर टीम इंडियाचे एक-एक फलंदाज एका पाठोपाठ तंबूत परतत राहिले.

विशेष म्हणजे, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. शुभमन गिल या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत कोहलीला नंबर तीनवर फलंदाजी करावी लागली.

पण भारतीय संघाचे रन मशिन म्हणून प्रसिद्ध असलेला विराट कोहली शून्यावर बाद झाला. यासह त्याने एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला.

सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणारे सक्रिय खेळाडू

विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर आउट होणारा सक्रिय खेळाडू बनला आहे. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो ३८व्यांदा शून्यावर बाद झाला. या लाजिरवाण्या विक्रमात त्याने किवी संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीची बरोबरी केली. साउथी हादेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

विराट कोहली- ३८ वेळा

टिम साउथी - ३८ वेळा

रोहित शर्मा- ३३ वेळा

जॉनी बेअरस्टो- ३२ वेळाे

न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली या वर्षात भारतासाठी फक्त 3 कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या बॅटने 157 धावा केल्या आहेत. कोहलीचे 2024 मध्ये कसोटीत शतक खूप दूर आहे. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. भारताला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ७ कसोटी सामने खेळायचे आहेत. कोहलीचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या