विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये डेविड वॉर्नरचा विक्रम मोडत बनला नंबर-१
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये डेविड वॉर्नरचा विक्रम मोडत बनला नंबर-१

विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये डेविड वॉर्नरचा विक्रम मोडत बनला नंबर-१

HT Marathi Desk HT Marathi
Updated Apr 20, 2025 07:02 PM IST

विराट कोहलीची ही आयपीएलमधील ६७वी ५०+ धावसंख्या आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने ६६ वेळा ही कामगिरी केली होती. आता कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ५०+ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

विराट कोहली
विराट कोहली (REUTERS)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध आणखी एक अर्धशतक झळकावत इतिहास रचला आहे. किंग कोहली इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडला आहे. कोहलीच्या बॅटमधील हे शानदार अर्धशतक एका निर्णायक वळणावर आले. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला १५८ धावांचे लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिल सॉल्ट पहिल्या ओव्हरमध्येच आऊट झाला होता, त्यानंतर सर्व दबाव विराट कोहलीवर आला. कोहलीने पडिक्कलसोबत शतकी भागीदारी करत संघाला विजयाचा मार्ग दाखवला.

विराट कोहलीची ही आयपीएलमधील ६७वी ५०+ धावसंख्या आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने ६६ वेळा ही कामगिरी केली होती. आता कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ५०+ धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

IPL च्या इतिहासात सर्वाधिक ५०+ स्कोर बनवणारे फलंदाज -

विराट कोहली- 67

डेव्हिड वॉर्नर- 66

शिखर धवन- 53

रोहित शर्मा- 45

केएल राहुल 43

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या कारकिर्दीतील हा २६० वा सामना आहे, त्याने आतापर्यंत ५९ अर्धशतके आणि ८ शतके ठोकली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे.

आयपीएल २०२५ मध्ये धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत विराट कोहलीचा विक्रम शानदार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सनंतर आता त्याने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतक झळकावले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या