Virat Kohli : ४५ मिनिटे फलंदाजी आणि त्यानंतर… चेन्नईत पहिल्या दिवशी कोहलीने कायकाय केले, पाहा-virat kohli batting for 45 minutes net practice team india 1st training day in chennai ahead of ind vs ban 1st test ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : ४५ मिनिटे फलंदाजी आणि त्यानंतर… चेन्नईत पहिल्या दिवशी कोहलीने कायकाय केले, पाहा

Virat Kohli : ४५ मिनिटे फलंदाजी आणि त्यानंतर… चेन्नईत पहिल्या दिवशी कोहलीने कायकाय केले, पाहा

Sep 14, 2024 12:08 PM IST

विराट कोहली जवळपास ४५ मिनिटे नेटमध्ये फलंदाजी करत राहिला. याशिवाय जसप्रीत बुमराहने नेट सराव केला. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल उपस्थित होते.

Virat Kohli : ४५ मिनिटे फलंदाजी आणि त्यानंतर… चेन्नईत पहिल्या दिवशी कोहलीने कायकाय केले, पाहा
Virat Kohli : ४५ मिनिटे फलंदाजी आणि त्यानंतर… चेन्नईत पहिल्या दिवशी कोहलीने कायकाय केले, पाहा (AFP)

भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचे यजमानपद चेन्नईकडे आहे. दोन्ही संघांचे खेळाडू चेन्नईला पोहोचले असून खेळाडूंनी कसून सराव केला.

त्याच वेळी, भारतीय दिग्गज विराट कोहलीनेही नेटमध्ये घाम गाळला. विराट कोहली जवळपास ४५ मिनिटे नेटमध्ये फलंदाजी करत राहिला. याशिवाय जसप्रीत बुमराहनेही नेट प्रॅक्टिस केली. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल उपस्थित होते.

विराट ३ वर्षांनंतर चेपॉकमध्ये कसोटी खेळणार

तत्पर्वी, विराट कोहली लंडनहून थेट चेन्नईला पोहोचला. कोहली तब्बल ३ वर्षांनंतर चेन्नईच्या चेपॉक मैदानावर कसोटी खेळणार आहे. या मैदानावर विराट कोहलीची सरासरी ४४.५० इतकी आहे. चेपॉकमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत २६७ धावा केल्या आहेत.

याच मैदानावर विराट कोहलीने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. आता विराट कोहली तब्बल ३ वर्षानंतर चेपॉकमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, विराट कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीसाठी चेपॉक सज्ज!

भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. यानंतर २७ सप्टेंबरपासून मालिकेतील दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे.

दोन्ही संघ कानपूरमध्ये आमनेसामने येणार आहेत. वास्तविक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील गुणतालिकेच्या दृष्टीने भारत-बांगलादेश कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघाला गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह, यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ-

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, मोहम्मद. सय्यद खालेद अहमद, जाकेर अली.

Whats_app_banner