Ind vs Aus : विराटचा खराब फॉर्म, गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल… टीम इंडियासमोरील ५ सर्वात मोठ्या अडचणी, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : विराटचा खराब फॉर्म, गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल… टीम इंडियासमोरील ५ सर्वात मोठ्या अडचणी, वाचा

Ind vs Aus : विराटचा खराब फॉर्म, गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल… टीम इंडियासमोरील ५ सर्वात मोठ्या अडचणी, वाचा

Nov 19, 2024 12:44 PM IST

Ind vs Aus Perth Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत येथे मालिका जिंकणे टीम इंडियासाठी कठीण होऊ शकते.

Ind vs Aus : विराटचा खराब फॉर्म, गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल… टीम इंडियासमोरील ५ सर्वात मोठ्या अडचणी, वाचा
Ind vs Aus : विराटचा खराब फॉर्म, गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल… टीम इंडियासमोरील ५ सर्वात मोठ्या अडचणी, वाचा (PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे मालिका गमावण्याचा धोका वाढताना दिसत आहे.

येथे आपण टीम इंडियाच्या ५ सर्वात मोठ्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म आणि गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल यांचा समावेश आहे.

१) विराट कोहलीचा खराब फॉर्म

विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मात आहे. केवळ कसोटीतच नाही तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्येही कोहलीची काही काळापासून चांगली कामगिरी झालेली नाही. यापूर्वी टीम इंडियाने घरच्या भूमीवर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती.

न्यूझीलंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत कोहलीने ००, ७०, ०१, १७, ०४ आणि ०१ धावा केल्या. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.

२) रोहित शर्माचा खराब फॉर्म

विराट कोहलीच नाही तर भारतीय कर्णधार रोहित शर्माही खराब फॉर्मशी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधाराची बॅट पूर्णपणे शांत दिसली. रोहित शर्माने तीन कसोटी सामन्यांच्या ६ डावात केवळ एक अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी रोहित शर्मा बांगलादेश मालिकेतही फ्लॉप झाला होता.

३) गौतम गंभीरची खराब कोचिंग

आतापर्यंत गौतम गंभीरचे कोचिंग टीम इंडियासाठी फ्लॉप ठरले आहे. त्यामुळे गंभीरच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाने अनेक लज्जास्पद विक्रम केले आहेत. गंभीरच्या कोचिंगमध्येच टीम इंडियाला घरच्या भूमीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉशचा सामना करावा लागला. याशिवाय गंभीरचे कोचिंग टीम इंडियासाठी अनेक प्रकारे वाईट ठरले आहे.

४) ओपनिंग जोडीची समस्या

रोहित शर्माचा खराब फॉर्म टीम इंडियाच्या ओपनिंगसाठी चिंता निर्माण करत आहे. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलला सलामीवीर म्हणून पाहिले जाऊ शकते, परंतु सध्या राहुल देखील खराब फॉर्ममधून जात आहे.

अशा स्थितीत संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवले की शुभमन गिल सलामीसाठी पुढे येऊ शकतो. मात्र, वृत्तानुसार, अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे गिल पहिल्या कसटोीला मुकण्याची शक्यता आहे.

५) बुमराहवर अतिरिक्त दबाव

टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहवर वेगवान गोलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. बुमराहसह मोहम्मद सिराज संघात आहे. सिराज गेल्या काही सामन्यांमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरत असून बाकीचे वेगवान गोलंदाज फारसे अनुभवी नाहीत.

तसेच, पहिल्या पर्थ कसोटीत रोहित शर्मा खेळणार नाही. अशा स्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कर्णधार असेल. कर्णधारपदाचा अतिरिक्त दबावही बुमराहवर असणार आहे. अशा परिस्थितीत बुमराहवरील जबाबदारी आणखी वाढणार आहे.

Whats_app_banner