Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा काही खास नव्हता. यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता विराट कोहली हा भारतात परतल्यानंतर प्रेमानंद जी महाराजांना भेटायला पोहोचला.
यावेळी विराटसोबत पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. कोहलीने याआधीही प्रेमानंज महाराज यांची भेट घेतली आहे. यावेळी अनुष्काने प्रेमानंद महाराजांकडून एक खास गोष्ट मागितली.
कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का आपल्या मुलांसह प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी अनुष्काने प्रेमानंद महाराजांना सांगितले की, “गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमच्या मनात प्रश्न होते. पण बसलेले सगळे जण सारखेच प्रश्न विचारत होते.
यावेळीही आपण इथे येण्याचा विचार करत होतो, तेव्हा मी मनातल्या मनात तुमच्याशी बोलत होते. तूम्ही मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या'.
लग्नापूर्वी विराट कोहलीचा देवावर फारसा विश्वास नव्हता. पण अनुष्कासोबत लग्न केल्यानंतर तो बदलला आहे. विराटने यापूर्वीही प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली आहे.
पत्नी अनुष्कासोबत तो कैंची धामलाही जाऊन आला आहे. कोहली आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या तयारीला सुरुवात करेल. याआधी तो आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने शतक झळकावले होते. त्याने दुसऱ्या डावात नाबाद १०० धावा केल्या. मात्र यानंतर तो सपशेल फ्लॉप झाला. ॲडलेड कसोटीत ७ धावा आणि ११ धावा करून कोहली बाद झाला.
यानंतर मेलबर्नमध्ये ३६ धावा आणि ५ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तर सिडनी कसोटीत तो १७ धावा आणि ६ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे कोहलीसाठी हा दौरा निराशाजनक राहिला. या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
संबंधित बातम्या