मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट झाले? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, जाणून घ्या

Virat Kohli : विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट झाले? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, जाणून घ्या

Jul 07, 2024 10:02 PM IST

कोहली आणि अनुष्काबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सुरू असतात. सध्या दोघेही लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र यावर विराट किंवा अनुष्काकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट झाले? चर्चांना उधाण, जाणून घ्या
विराट-अनुष्का भारत सोडून लंडनला शिफ्ट झाले? चर्चांना उधाण, जाणून घ्या (Instagram/@anushkasharma)

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर विराट कोहली मुंबईहून थेट लंडनला गेला आहे. विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि अकाय-वामिकासह लंडनमध्ये आहे. मुलाच्या जन्मापासून अनुष्का तिथेच राहत आहे.

अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोहली आणि अनुष्का भारत सोडून कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत. मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा माहिती समोर आलेली नाही.

वास्तविक, कोहली आणि अनुष्काबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी सुरू असतात. सध्या दोघेही लंडनला शिफ्ट झाल्याचा दावा एका पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र यावर विराट किंवा अनुष्काकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर विराट दिल्लीला आला होता. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तो मुंबईला रवाना झाला. येथे विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर विराट थेट लंडनला गेला.

ट्रेंडिंग न्यूज

विराट-अनुष्काचे लंडनमध्ये घर

विराट कोहलीची खूप संपत्ती आहे. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोहलीने अलीबागमध्ये नुकताच १० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. आता त्याने लंडनमध्ये घर घेतल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

कोहली-अनुष्का लंडनमध्ये बराच वेळ घालवतात

अनुष्का बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. अकायच्या जन्माआधीच ती लंडनला गेली आहे. अकायचा जन्म लंडनमध्येच झाल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अनुष्का गेल्या अनेक महिन्यांपासून तिथे राहत आहे. मात्र यात किती तथ्य आहे याची पुष्टी झालेली नाही.

WhatsApp channel