प्रेमानंद महाराजांच्या दरबारात अकाय कोहलीची मस्ती, पुढे अनुष्कानं काय केलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  प्रेमानंद महाराजांच्या दरबारात अकाय कोहलीची मस्ती, पुढे अनुष्कानं काय केलं? पाहा

प्रेमानंद महाराजांच्या दरबारात अकाय कोहलीची मस्ती, पुढे अनुष्कानं काय केलं? पाहा

Jan 10, 2025 07:16 PM IST

Virat Anushka Premanand Maharaj : कोहली आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही वेळातच लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

प्रेमानंद महाराजांच्या दरबारात छोट्या अकाय कोहलीची मस्ती, पुढे अनुष्कानं काय केलं? पाहा
प्रेमानंद महाराजांच्या दरबारात छोट्या अकाय कोहलीची मस्ती, पुढे अनुष्कानं काय केलं? पाहा

Virat Kohli Anushka Sharma Premanand Maharaj : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर कोहली आणि अनुष्का वृंदावन येथील प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जात असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो धावा काढण्यासाठी झगडत होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोहली आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही वेळातच लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

प्रेमानंद महाराजांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये कोहली आणि अनुष्का त्यांच्या दोन मुलांसह वामिका आणि अकाय यांच्यासोबत प्रेमानंद महाराजांना भेटायला पोहोचले होते.

अनुष्काने अशी घेतली अकायची काळजी

प्रेमानंद महाराजांच्या प्रेक्षागृहात पोहोचताच अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरची शांतता आणि तेज पाहण्यासारखे होते. यावेळी अनुष्का केवळ भक्तीमध्येच रमलेली दिसली नाही तर तिच्या धाकट्या मुलाची खूप काळजी घेतानाही दिसली.

खरं तर, ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर आणि मायदेशी परतताच विराट कोहली आध्यात्मिक गुरू प्रेमानंद जी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन धामला गेला होता.

यादमरम्यान छोटा अकाय आईच्या मांडीवरून खाली उतरून लोळताना दिसला. अशात अनुष्काने पुन्हा त्याला मांडीवर घेतले. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची प्रेमानंद महाराजांना भेटण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही ते जानेवारी २०२३ मध्ये भेटले होते. हे सेलिब्रिटी जोडपे दीर्घकाळापासून प्रेमानंद महारांजांचे शिष्य आहेत.

मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या' - अनुष्का शर्मा

कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का आपल्या मुलांसह प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी अनुष्काने प्रेमानंद महाराजांना सांगितले की, "गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आमच्या मनात प्रश्न होते. पण बसलेले सगळे जण सारखेच प्रश्न विचारत होते.

यावेळीही आपण इथे येण्याचा विचार करत होतो, तेव्हा मी मनातल्या मनात तुमच्याशी बोलत होते. तूम्ही मला फक्त प्रेम आणि भक्ती द्या'.

Whats_app_banner