मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat-Anushka : अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार! एबी डिव्हिलियर्सनं सांगितली गोड बातमी

Virat-Anushka : अनुष्का-विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार! एबी डिव्हिलियर्सनं सांगितली गोड बातमी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 03, 2024 09:19 PM IST

Virat-Anushka Second Child : विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग घेणार नसणार, असे बीसीसीआयने सांगितले होते. पण तिसऱ्या कसोटीतही विराट कोहली खेळणार का? हा प्रश्न कायम आहे.

Anushka Virat
Anushka Virat

भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले.

विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग घेणार नसणार, असे बीसीसीआयने सांगितले होते. पण तिसऱ्या कसोटीतही विराट कोहली खेळणार का? हा प्रश्न कायम आहे.

या दरम्यान, विराट कोहलीच्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे विराटने ब्रेक घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. पण विराटचा भाऊ विकास कोहलीने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले.

पण आता विराट कोहली क्रिकेटपासून दूर का आहे, याचा खुलासा विराटचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने केला आहे.

खरंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत. होय... हा खुलासा कोहलीचा खास मित्र एबी डिव्हिलियर्सने केला आहे.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, अलीकडेच विराट कोहलीसोबत बोलणे झाले. सध्या विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत आहे आणइ विराट दुसऱ्यांदा बाप बनणार आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०२१ मध्ये पहिल्यांदा आई-वडील बनले होते. त्यावेळी अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचे नाव विरुष्का आहे.

आता एबी डिव्हिलियर्सच्या या माहितीवर विश्वास ठेवला तर हे जोडपे दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत.

WhatsApp channel