रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे दोन सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जातात, परंतु ते अली कडच्या काळात अतिशय खराब फॉर्मातून जात आहेत. २०२४ मधील या दोन खेळाडूंचे आकडे पाहून क्रिकेट चाहते त्यांना निवृत्तीचा सल्ला देऊ लागले आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ च्या दुसऱ्या कसोटीत कोहली आणि रोहित दोन्ही डावात अनुक्रमे १८ आणि ९ धावा करू शकले. या दोघांचे फ्लॉप होणे, हे टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.
या दरम्यानच आता असे काही आकडे समोर आले आहेत, जे विराट आणि रोहित हे २०२४ मधील सर्वात खराब फलंदाज असल्याचे सिद्ध करतात.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर त्याने या वर्षात २३ कसोटी डावात फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये त्याची सरासरी केवळ २७.१३ आहे. त्याने यावर्षी ५९७ धावा केल्या आहेत ज्यात दोन शतके आणि फक्त २ अर्धशतकांचा समावेश आहे.
२०२४ मधील सर्वात खराब कसोटी सरासरी असणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे.
विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे, जो या वर्षात आतापर्यंत १६ कसोटी डावांमध्ये केवळ ३७३ धावा करू शकला आहे. २०२४ मध्ये त्याची सरासरी केवळ २६.६४ आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून फक्त एक शतक आणि एक अर्धशतक आले आहे.
विराट कोहली - २६.५४
रोहित शर्मा - २७.१३
केएल राहुल - ३४.६३
विशेषत: रोहित शर्माला चेंडू आणि बॅट यांच्यातील संबंध जोडणेही कठीण होत आहे. २०१२-२०२२ पर्यंत, रोहित शर्माने ७७ डावांमध्ये फलंदाजी केली, ज्यामध्ये तो ११ वेळा बोल्ड झाला. तर २०२३-२०२४ या काळात, त्याने आतापर्यंत ३६ डाव खेळले आहेत, ज्यामध्ये तो ११ वेळा बोल्ड झाला आहे.
रोहित धावा काढण्यासाठी धडपडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दुसरीकडे, जर आपण विराट कोहलीवर नजर टाकली तर त्याने अलीकडेच ९००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु त्याचा अलीकडचा फॉर्म पाहता त्याला १०००० धावांचा आकडा गाठण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल.
संबंधित बातम्या