India vs Australia : टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा खराब फॉर्म कायम आहे. मेलबर्न कसोटीतही या खेळाडूंच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या कसोटी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत.
अशा परिस्थितीत हा ऑस्ट्रेलिया दौरा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र या मोठ्या संधीचा फायदा उठवण्यात रोहित आणि विराट अपयशी ठरले आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियामध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता यातील एक दिग्गज कसोटी फॉरमॅट सोडू शकतो, असे मानले जात आहे.
मेलबर्न कसोटीतील विजय टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे, अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंग पावू शकते. पण या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरले. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माने ३१ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या डावातही तो केवळ ९ धावाच करू शकला.
दुसरीकडे विराट कोहलीही फ्लॉप ठरला. पहिल्या डावात ३६ धावा केल्यानंतर त्याला दुसऱ्या डावात केवळ ५ धावा करता आल्या. या खराब कामगिरीनंतर रोहित आणि विराट आता चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट चाहते रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर अभिनंदनाच्या पोस्ट करत आहेत. म्हणजेच या दोन खेळाडूंची कसोटी कारकीर्द आता संपली असून भविष्यात ते कसोटी खेळताना दिसणार नाहीत, असेच चाहत्यांनी मानले आहे.
विराट आणि रोहितच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत असून '#HappyRetirement' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
विराटचा फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘विराट कोहली निवृत्तीच्या शुभेच्छा.’ त्याचवेळी एका यूजरने रोहितसाठी लिहिले, ‘रोहित आणि विराट कसोटीतून निवृत्त झाले! आठवणींसाठी धन्यवाद. निवृत्तीच्या शुभेच्छा.
रोहित शर्मासाठी ही मालिका खूपच वाईट ठरली आहे. आतापर्यंत त्याला ३ सामन्यांच्या ५ डावात ६.२० च्या खराब सरासरीने केवळ ३१ धावा करता आल्या आहेत. ज्यामध्ये १० धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
त्याचबरोबर विराट कोहलीने ४ सामन्यांच्या ७ डावात २७.८३ च्या सरासरीने १६७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १ शतकाचा समावेश आहे. मात्र या शतकाशिवाय संपूर्ण मालिकेत त्याने काही विशेष कामगिरी केली नाही.
संबंधित बातम्या