Video : आरसीबी-हैदराबाद सामन्यानंतर कोहली-मयंक अग्रवालचं भांडण, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : आरसीबी-हैदराबाद सामन्यानंतर कोहली-मयंक अग्रवालचं भांडण, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा

Video : आरसीबी-हैदराबाद सामन्यानंतर कोहली-मयंक अग्रवालचं भांडण, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा

Apr 18, 2024 03:00 PM IST

IPL 2024 Fact Check : सनरायझर्स हैदराबादचा मयंक अग्रवाल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे की, आरसीबीच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोहली आणि मयंक अग्रवाल यांच्यात राडा झाला.

Video : आरसीबी-हैदराबाद सामन्यानंतर कोहली-मयंक अग्रवालचं भांडण, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा
Video : आरसीबी-हैदराबाद सामन्यानंतर कोहली-मयंक अग्रवालचं भांडण, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? पाहा

Virat Kohli and Mayank Agarwal Fight Fact Check : इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. पण त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अतिशय बिकट आहे. आरसीबी पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे आणि ते आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.

या दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये असा दावाही केला जात आहे की, विराट कोहली विरोधी संघातील खेळाडूसोबत भांडण करतो आहे.

आरसीबी पॉइंट टेबलमध्ये १०व्या स्थानावर

वास्तविक, हे सर्वांना माहीत आहे की RCB चा स्टार खेळाडू विराट कोहली सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना गमावल्यानंतर खूपच निराश दिसत होता. हा एक हाय-स्कोअरिंग थ्रिलर सामना होता, ज्यामध्ये पॅट कमिन्स आणि त्याच्या संघाने टी-20 ची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यानंतर आरसीबीने तो सामना २५ धावांनी गमावला. SRH विरुद्धच्या पराभवानंतर, RCB आता गुणतालिकेत १० व्या क्रमांकावर आहे.

मयंक-विराटमध्ये भांडण

हैदराबाद-आरसीबी सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर कोहली आणि मयंक अग्रवाल यांच्यात वाद झाला होता.

पण या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले आहे. वास्तविक,विराट कोहली आणि मयंक अग्रवाल विनोद करतानाचा हा जुना व्हिडिओ आहे. खास गोष्ट म्हणजे कोहलीने घातलेली जर्सी जुनी आहे.

आरसीबी त्यांच्या जर्सीमध्ये जवळजवळ दरवर्षी काही बदल करत असतात. दुसरीकडे मयंक आणि कोहली यांचे चांगले संबंध असून ते टीम इंडियामध्ये एकत्र खेळतात. हा भांडणाचा व्हिडीओ नसून मजाक-मस्ती करतानाचा जुना व्हिडीओ आहे.

मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजला डच्चू

हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर बेंगळुरूचा हा ७ सामन्यांतील ६वा पराभव होता. आरसीबीने या सामन्यात मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांना बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला होता, पण यानंतर त्यांची गोलंदाजी पूर्वीपेक्षा वाईट दिसत होती. या सामन्यात पार्ट टाईम गोलंदाज विल जॅकने सर्वोत्तम गोलंदाजी केली. तर मेन गोलंदाजांची धुलाई झाली. जॅकने आपल्या ३ षटकांत ३२ धावा दिल्या. वेगवान गोलंदाज रीस टोपली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि विजयकुमार विशक यांनी १० षटकात १३७ धावा दिल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या