मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli House : विराट कोहलीचे अलिबागचे घर आतून कसे दिसते? बंगल्यात काय-काय व्हिडीओत पाहा

Virat Kohli House : विराट कोहलीचे अलिबागचे घर आतून कसे दिसते? बंगल्यात काय-काय व्हिडीओत पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 10, 2024 07:52 PM IST

Virat Kohli alibag House : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिका सुरू होण्याआधीच विराट कोहलीने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत कोहली त्याचे अलिबागमधील अलीशान घराचे (virat kohli alibaug house) दर्शन घडवून आणत आहे.

virat kohli alibaug house
virat kohli alibaug house (Hindustan Times)

Virat Kohli Alibag House Video: दक्षिण आफ्रिकेच्या प्रदीर्घ दौऱ्यानंतर टीम इंडिया आता मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. दोघेही तब्बल १४ महिन्यानंतर भारतीय टी-20 संघात परतले आहेत.

असं विराटचं अलिबागचं घर

मात्र, ही मालिका सुरू होण्याआधीच विराट कोहलीने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत कोहली त्याचे अलिबागमधील अलीशान घराचे दर्शन घडवून आणत आहे. कोहलीने त्याच्या अलिबागमधील घरात काय-काय आहे, या घराची खासियत काय आहे? हे सर्व अगदी व्यवस्थितपणे सांगितले आहे.

खरंतर, विराट कोहलीचा अलिबागचा बंगला याआधीही खूप चर्चेत राहिला आहे. तुम्हाला हे जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल की या आलिशान घराच्या लिव्हिंग रूममध्ये टीव्ही नाही. हे घर नुकतेच पूर्ण झाले आहे.

विराट कोहली पहिला सामना खेळणार नाही

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय विराट कोहली भारतीय संघाच्या टी-20 जर्सीत दिसणार आहे. पण कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणार नाही.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. कोहलीबाबत द्रविड म्हणाले की, 'तो (विराट) पहिला सामना खेळणार नाही. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी कोहली वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध असणार नाही. मात्र, त्यानंतर तो दुसरा आणि तिसरा टी-२० सामना खेळणार आहेत.'

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel