Rinku Singh Performs Pushpa Step Video : टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंग त्याच्या चमकदार कामगिरीसाठी ओळखला जातो. मात्र आता आपल्या शानदार खेळासोबतच त्याने आपल्या मनोरंजक शैलीने चाहत्यांची मनेही जिंकली आहेत.
रिंकू सिंग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो तेलुगु चित्रपट 'पुष्पा'ची सुपरहिट सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहे. ही स्टेप चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन याने त्याच्या 'पुष्पा' चित्रपटात केली होती. ही स्टेप अल्पावधीतच देशभर लोकप्रिय झाली.
व्हिडिओमध्ये, रिंकू सिंग जिममध्ये आपल्या मित्रांसोबत डान्स मूव्हची कॉपी करताना दिसत आहे. त्याच्यासोबत मित्रही 'पुष्पा' ची स्टेप करून वातावरण आणखीनच मजेदार बनवत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.
क्रिकेटच्या मैदानाबाहेर रिंकू सिंगची स्टाईल चाहत्यांसाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानेही अनेक वेळा 'पुष्पा' स्टेप केली आहे, मात्र रिंकूचा हा व्हिडिओ क्रिकेट आणि सिनेप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
रिंकू सिंगने नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून टी-20 मालिका खेळली होती. याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) त्याला आयपीएल २०२५ साठी पूर्ण १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. या मोठ्या डीलनंतर रिंकूने अलीगढमध्ये एक आलिशान घर खरेदी केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
रिंकू सिंग क्रिकेटच्या मैदानावरील स्फोटक फलंदाजी आणि मैदानाबाहेर त्याच्या मनोरंजक शैलीमुळे सतत चर्चेत असतो.
रिलीजनंतर १०व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने ६२.३ कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी ४६ कोटी रुपये हिंदीतून आणि १३ कोटी रुपये तेलुगूमधून आले.
शुक्रवारी एकूण कलेक्शन केवळ ३६.५ कोटी रुपये होते. त्यामुळे चित्रपटाची कमाई थेट दुप्पट झाली आहे. Sacnilk.com च्या मते, भारतातील सर्व भाषांमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ८२४.५ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या