पाकिस्तान क्यू नहीं आ रहे? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमारनं दिलं ‘असं’ उत्तर, व्हिडिओ होतोय व्हायरल!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पाकिस्तान क्यू नहीं आ रहे? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमारनं दिलं ‘असं’ उत्तर, व्हिडिओ होतोय व्हायरल!

पाकिस्तान क्यू नहीं आ रहे? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमारनं दिलं ‘असं’ उत्तर, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Nov 12, 2024 11:40 AM IST

Suryakumar Yadav Viral Video: पाकिस्तानच्या एका चाहत्याने सूर्यकुमार यादवला विचारले की, तू आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानात का येत नाहीस? यावर सूर्या म्हणाला की, हे आमच्या हातात नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी- मार्चमध्ये खेळवली जाईल.

पाकिस्तान क्यू नहीं आ रहे? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमारनं दिलं ‘असं’ उत्तर!
पाकिस्तान क्यू नहीं आ रहे? चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमारनं दिलं ‘असं’ उत्तर! (PTI)

Suryakumar Yadav News: पाकिस्तानात पुढच्या खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, संघ आणि संघाच्या चाहत्यांची इच्छा आहे की, या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे. परंतु, भारतीय संघ कोणत्याही किंमतीवर पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही, हे बीसीसीआयचे आधीच स्पष्ट केले आहे. याबाबत बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून भारतीय क्रिकेट संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळण्यासाठी तयार नसल्याचे म्हटले. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका चाहत्याने भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला तुम्ही पाकिस्तानात का येत नाहीत? असा प्रश्न विचारला. यावर सुर्यकुमारने उत्तर दिले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली् भारतीय संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू आऊटिंगवर दिसले. यादरम्यान, काही पाकिस्तानी चाहत्यांची त्यांची भेट घेतली. त्यापैकी एका चाहत्याने तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात का येत नाहीत? असा प्रश्न सूर्यकुमार यादवला विचारला. यावर सूर्यकुमार म्हणाला की, हे आमच्या हातात नाही. सूर्यकुमारचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

सूर्यकुमारचे उत्तरही बरोबरच आहे. कारण भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याचा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकार घेणार आहे. परंतु, शेवटचा निर्णय तोच असेल की, भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात जाणार नाही. दोन देशांतील तणावामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर येतात. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळली गेली तर, भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. पण भारताशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे जवळपास अशक्य आहे. कारण सध्या क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ भारत आहे आणि सर्वात मोठा ब्रँड टीम इंडिया आहे. भारताने या स्पर्धेतून माघार घेतली तर. या स्पर्धेचे बाजारमूल्य काहीही राहणार नाही. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलवर स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. भारताचे सामने दुबईत होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner