गृहमंत्री अमित शहा सध्या गुजरातमध्ये आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये ते पतंग उडवताना दिसले. याआधी त्यांनी कुटुंबासह जगन्नाथ मंदिरात पूजा केली. या पूजेदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अमित शाह हे त्यांचा मुलगा आणि ICC चेअरमन जय शाह यांना फटकारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की वडिलांच्या फटकारण्यापासून कोणीही सुटू शकत नाही, मग ते आयसीसीचे अध्यक्ष असले तरी.
व्हायरल व्हिडीओमध्ये गृहमंत्री अमित शाह कुटुंबियांसोबत पूजा करताना दिसत आहेत. यावेळी जय शाह यांनी आपल्या मुलाला आपल्या हातात पकडले होते. आरतीनंतर अमित शाह आपल्या सर्वांना आरती दिली. यावेळी जय शाह यांच्यात हातात असलेल्या नातवालाही त्यांनी आरती दिली. यावेळी जय शाह यांनी आपले हात थोडेसे मागे घेतले. कारण आरतीच्या झळा बाळाला लागत होत्या. हे पाहून अमित शाह लगेच म्हणाले, काही होणार नाही, तुझा मुलगा काय नवीन आणि अनोखा नाही.'
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटले की, "वडील हे नेहमी घराचे बॉस असतात. मह मुलगा आयसीसीचा अध्यक्ष असला तरी. त्यांना काही फरक पडत नाही!
दरम्यान, जय शाह दुसऱ्यांदा वडील झाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत. यावेळी अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह याही उपस्थित होत्या. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री जेव्हा जेव्हा गुजरातच्या दौऱ्यावर असतात तेव्हा ते जवळजवळ सर्वच प्रमुख प्रसंगी भगवान जगन्नाथ मंदिराला भेट देतात.
अमित शाह यांच्या खास शैलीचे कौतुक होत आहे. अमित शहा गृहमंत्री असताना, त्यांचा मुलगा जय शाह आयसीसीचे (ICC) अध्यक्ष आहेत. ते यापूर्वी बीसीसीआयचे सचिव होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याचे २०१५ मध्ये लग्न झाले. त्यांचा विवाह ऋषिता पटेल यांच्याशी झाला आहे. जय शहा यांनी निरमा विद्यापीठातून बी.एस्सी. टेकचे शिक्षण घेतले आहे. यानंतर ते क्रिकेट प्रशासक म्हणून सक्रिय आहे. ३६ वर्षीय जय शाह हे आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत.
संबंधित बातम्या