मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video: चौकार रोखण्यासाठी चक्क ५ खेळाडू चेंडूमागे धावले; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल!

Viral Video: चौकार रोखण्यासाठी चक्क ५ खेळाडू चेंडूमागे धावले; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 02, 2024 04:53 PM IST

Five Bangladeshi fielders chasing ball Video: चौकार रोखण्यासाठी बांगलादेशचे पाच खेळाडू चेंडूमागे धावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एक चेंडू रोखण्यासाठी पाच खेळाडू धावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एक चेंडू रोखण्यासाठी पाच खेळाडू धावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Funny Video: क्रिकेटच्या मैदानावर अनेक वेळा अशा काही घटना घडतात, ज्यामुळे आपल्याला हासू आवरता येत नाही. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात असाच काही प्रकार घडला. एका चेंडूला रोखण्यासाठी चक्क पाच खेळाडू धावले, हे पाहून मैदानातील प्रेक्षकांना हासू आवरता आले नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीलंकेच्या डावातील २१व्या षटकात प्रभात जयसूर्याने बांगलादेशच्या हसन महमूदच्या गोलंदाजीवर गली मध्ये शॉट खेळला. यानंतर स्लिपमध्ये उपस्थित पाचही खेळाडू चौकार रोखण्यासाठी धावू लागले. पाच खेळाडूंना एकत्र धावताना पाहून मैदानातील प्रेक्षकांसह समालोचकांनाही आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये हे काय चाललंय? अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने 'लगान टीम' म्हणत बॉलिवूड आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटाची आठवण करून दिली.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेने दुसऱ्या धावात ६ विकेट गमावून १०२ धावा केल्या. प्रभात जयसूर्या आणि अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज नाबाद पव्हेलियनमध्ये पोहोचले. श्रीलंकेने एकूण ४५५ धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ५३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघ ६८.४ षटकांत १७८ धावांवर आटोपला. यामुळे श्रीलंकेला ३५३ धावांची आघाडी मिळाली आहे.

IPL_Entry_Point