भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी हा काही काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत होता. कांबळी यालाही काही दिवस रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.
कांबळीची अवस्था खूपच वाईट झाली होती, त्याला नीट चालताही येत नव्हते. त्याची अवस्था पाहून अनेक माजी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशा परिस्थितीत कांबळीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कांबळी नुकताच वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दिसला. यावेळी त्याची पत्नी अँड्रियाही त्याच्यासोबत होती. कांबळी पत्नी अँड्रियायाचा हात धरून चालत होता. हे दृश्य पाहून सर्वांनी तिचे कौतुक केले. अँड्रिया व्यवसायाने मॉडेल आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे.
अँड्रियाने २००६ मध्ये विनोद कांबळीसोबत कोर्ट मॅरेज केले होते. पण अँड्रियाने २०२३ मध्ये कांबळीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
अँड्रिया ही विनोद कांबळीची दुसरी पत्नी आहे. अँड्रिया आणि कांबळीला दोन मुलंही आहेत, पण दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या नात्यात एवढा दुरावा आला की, अँड्रियाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, पण कांबळीची तब्येत पाहून तिने स्वत:ला थांबवले आणि निर्णय मागे घेतला.
अलीकडेच अँड्रियाने एका पॉडकास्टमध्ये कांबळीसोबतच्या तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.
अँड्रिया म्हणाली, की 'मी एकदा विभक्त होण्याचा विचार केला, पण मला समजले की जर मी त्याला सोडले तर तो निराधार होईल,' अँड्रिया म्हणाली. तो अगदी लहान मुलासारखा झाला आहे आणि हे सर्व पाहून मला खूप त्रास होतो.
मला त्याची नेहमी काळजी वाटते. मी एक अशी व्यक्ती आहे की मी माझ्या एखाद्या मित्रालाही सोडू शकत नाही, तो तर माझ्या मित्रापेक्षा जास्त आहे, त्याला माझी गरज आहे. म्हणूनच मी माझा विचार बदलला'.
संबंधित बातम्या