Vinod Kambli : गावसकरांच्या पाया पडला, पृथ्वी शॉचे गाल थोपटले, वानखेडेवर विनोद कांबळीची चर्चा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Vinod Kambli : गावसकरांच्या पाया पडला, पृथ्वी शॉचे गाल थोपटले, वानखेडेवर विनोद कांबळीची चर्चा

Vinod Kambli : गावसकरांच्या पाया पडला, पृथ्वी शॉचे गाल थोपटले, वानखेडेवर विनोद कांबळीची चर्चा

Jan 13, 2025 09:56 AM IST

Vinod Kambli Sunil Gavaskar : वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुंबईचे अनेक क्रिकेटपटू हजर होते.

Vinod Kambli : गावसकरांच्या पाया पडला, पृथ्वी शॉचे गाल थोपटले, वानखेडेवर विनोद कांबळीची चर्चा
Vinod Kambli : गावसकरांच्या पाया पडला, पृथ्वी शॉचे गाल थोपटले, वानखेडेवर विनोद कांबळीची चर्चा

Vinod Kambli Sunil Gavaskar At Wankhede Stadium : मुंबईतील वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने वानखेडे स्टेडियमवर एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबईचे आजी माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.

वास्तविक, वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) किक-ऑफ सोहळ्याचे आयोजक केले होते. या कार्यक्रमात महान फलंदाज सुनील गावसकर, माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांच्यासह मुंबईच्या क्रिकेट वर्तुळातील क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला.

कांबळी गावसकरांच्या पाया पडला

या सन्मान सोहळ्यात गावसकर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली. यावेळी कांबळी गावसकर यांच्यासमोर नतमस्तक झाला. कांबळीला २१ डिसेंबर रोजी प्रकृती खालावल्याने ICU मध्ये दाखल करण्यात आले होते.  

मी वानखेडेवर दोन द्विशतकं ठोकली- कांबळी

सन्मानित झाल्यानंतर कांबळीने वानखेडे स्टेडियमवर खेळण्याच्या त्याच्या दिवसांबद्दल सांगितले. तो म्हणाला, 'मला आठवते मी माझे पहिले द्विशतक इंग्लंडविरुद्ध येथेच झळकावले आणि त्यानंतर माझ्या कारकिर्दीत आणखी अनेक शतके झळकावली.

माझ्यासारख्या किंवा सचिन (तेंडुलकर) सारख्या कोणाला भारतासाठी खेळायचे असेल तर मी सल्ला देईन की तुम्ही कठोर परिश्रम करत राहा आणि ते करणे कधीही थांबवू नका कारण सचिन आणि मी ते लहानपणापासून केले आहे.

वानखेडेवर या दिग्गजांचा गौरव 

मुंबई क्रिकेटच्या समृद्ध वारशात योगदान देणाऱ्या संजय मांजरेकर, वसीम जाफर, राजू कुलकर्णी, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, शोभा पंडित आणि अरुंधती घोष यांच्यासह अनेक क्रिकेट दिग्गजांनाही सन्मानित करण्यात आले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या