भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बरी नसून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण नुकताच कांबळीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो नर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.
या दरम्यान, आता कांबळीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. वृत्तानुसार कांबळीकडे गेल्या ६ महिन्यांपासून फोन नाही. त्याने त्याचा आयफोन दुरुस्तीसाठी पाठवला होता, परंतु तो दुरुस्तीचे पैसे देऊ शकला नाही. अशा स्थितीत दुकानदाराने त्याचा फोन ठेवून घेतला होता. अशा स्थितीत गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्याकडे फोनही नाही. कांबळी याच्या फोनचे रिपेअरिंग चार्ज १५ हजार रुपये होते.
२१ डिसेंबर रोजी विनोद कांबळी याची प्रकृती अचानक बिघडली. अशा स्थितीत त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांबळीच्या मेडीकल रिपोर्टमध्ये त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले. एवढेच नाही तर त्याला युरिन इन्फेक्शनची समस्याही आहे.
आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. मात्र, त्याची स्मरणशक्ती कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टर म्हणाले, “वेळ आणि पुनर्वसनामुळे, भारतीय क्रिकेटपटू कांबळी त्याची ८०-९० टक्के स्मरणशक्ती परत मिळवू शकतो.
कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाशी झुंजत आहेत. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या मासिक पेन्शनवरच तो जगतोय. पर्व किकरला मंडळाकडून दरमहा ३० हजार रुपये मिळतात. मात्र, एकेकाळी त्यांची एकूण संपत्ती १३ कोटी रुपये होती.
विनोद कांबळीने १९९५ साली शेवटचा कसोटी सामना खेळला तर २००० मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला. पण त्याने २००९ साली आंतरराष्ट्रीय तर २०११ मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटला अलविदा केला.काबंळीने १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. कांबळीने कसोटीत ४ शतकं आणि ३ अर्धशतकांसह १ हजार ८४ धावा केल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये २ शतकं आणि १४ अर्धशतकांसह ३२.५९ च्या सरासरीने २ हजार ४७७ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या