आजारपणाशी झुंजणाऱ्या विनोद कांबळीला कपिल देव मदत करणार, पण 'या' एकाच अटीवर…
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आजारपणाशी झुंजणाऱ्या विनोद कांबळीला कपिल देव मदत करणार, पण 'या' एकाच अटीवर…

आजारपणाशी झुंजणाऱ्या विनोद कांबळीला कपिल देव मदत करणार, पण 'या' एकाच अटीवर…

Dec 05, 2024 04:48 PM IST

Vinod Kambli And Kapil Dev News : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची मानसिक आणि शारीरिक स्थिती अस्थिर आहे. कपिल देव आणि अन्य क्रिकेट सहकारी त्याला मदतीसाठी पुढे आले आहेत.

वाईट अवस्थेत असलेल्या विनोद कांबळीला कपिल देव मदत करणार, पण 'या' एकाच अटीवर…
वाईट अवस्थेत असलेल्या विनोद कांबळीला कपिल देव मदत करणार, पण 'या' एकाच अटीवर…

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नुकतेच महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा झाली. याच कार्यक्रमात सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन मित्रांची भेटही झाली. या भेटीमुळेच हा कार्यक्रम प्रचंड चर्चेत आला.

दरम्यान, हा कार्यक्रम आणखी एका कारणामुळे चर्चेत आला. ते म्हणजे, विनोद कांबळीची प्रकृती सध्या चांगली नसल्याचे सर्वांच्या समोर आले आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यात विनोद कांबळी आपला सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकरसोबत हातमिळवणी करत होता. सध्या कांबळीची शारीरिक आणि मानसिक स्थिती अस्थिर आहे.

अशा स्थितीत आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव हे कांबळीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

विनोद कांबळी यांचे निकटवर्तीय असलेले माजी प्रथम श्रेणी क्रिकेट पंच मार्कस काउटो यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "कांबळीच्या आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आहेत. कांबळी यापूर्वी १४ वेळा रिहॅब सेंटरमध्ये गेला आहे. तीन वेळा आम्ही त्याला वसईच्या रिहॅब सेंटरमध्ये नेले आहे. ऑगस्टमध्ये त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काउटो आणि त्यांचा भाऊ रिकीसोबत कांबळीची त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली आणि माजी क्रिकेटपटूच्या तब्येतीबद्दल आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी सुरू असलेल्या लढाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

याच दरम्यान आता कांबळीला आता अनपेक्षितपणे भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांचा मदतीचा हात मिळाला आहे. दारूच्या व्यसनामुळे कांबळीचे अनेक सहकारी आणि मित्र त्याच्यापासून दूर गेले. पण कपिल देव आणि १९८३ वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. तथापि, यामध्ये एक महत्वाची अट अशी आहे, की ठीक होण्यासाठी कांबळीला पहिले पाऊल टाकावे लागणार आहे.

माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू म्हणाले की, कपिल देव यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे, की जर त्याला पुनर्वसनात जायचे असेल तर आम्ही त्याला आर्थिक मदत करण्यास तयार आहोत.

मात्र, सर्वात आधी त्याने स्वत:ताच्या इच्छेने रिहॅब सेंटरमध्ये जायला हवे. जर त्याने तसे केले तर उपचार कितीही काळ चालले तरी आम्ही बिल भरायला तयार आहोत. कपिल देव यांनी यापूर्वीही आपल्या सहकाऱ्यांना किंवा माजी क्रिकेटपटूंना मदत केली आहे. ताजे प्रकरण अंशुमन गायकवाडशी संबंधित आहे, पण त्यांनी कॅन्सरमुळे या जगाचा निरोप घेतला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या