विनोद कांबळीची अवस्था खरंच इतकी वाईट आहे? व्हायरल व्हिडिओ पाहून वर्गमित्रांनी घेतली भेट, काय दिली माहिती?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विनोद कांबळीची अवस्था खरंच इतकी वाईट आहे? व्हायरल व्हिडिओ पाहून वर्गमित्रांनी घेतली भेट, काय दिली माहिती?

विनोद कांबळीची अवस्था खरंच इतकी वाईट आहे? व्हायरल व्हिडिओ पाहून वर्गमित्रांनी घेतली भेट, काय दिली माहिती?

Updated Aug 09, 2024 03:23 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनंतर विनोद कांबळीच्या मित्रांनी त्याच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट्स दिले आहेत. त्याच्या मित्रांनी सांगितले की व्हिडिओ जुना आहे आणि कांबळी आता पूर्णपणे फिट आहे.

Vinod Kambli : विनोद कांबळीचा 'तो' व्हायरल व्हिडीओ जूना! माजी क्रिकेटपटूंनी भेट घेऊन तब्यतेविषयी दिली माहिती
Vinod Kambli : विनोद कांबळीचा 'तो' व्हायरल व्हिडीओ जूना! माजी क्रिकेटपटूंनी भेट घेऊन तब्यतेविषयी दिली माहिती

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. कारण व्हिडीओमध्ये कांबळीला स्वत:च्या पायांवर उभेही राहता येत नव्हते. त्याला लोकांचा आधार घेऊन चालावे लागत होते.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की विनोद कांबळीच्या तब्येतीबद्दल लोक खूप चिंतित झाले आणि त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले.

पण आता नुकतेच विनोद कांबळी याच्या प्रकृतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये विनोद कांबळी पूर्णपणे बरा असून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्यात येत आहे.

माजी क्रिकेटपटूंनी विनोद कांबळीची भेट घेतली

अलीकडेच विनोद कांबळीचा शालेय मित्र रिकी आणि प्रथम श्रेणी क्रिकेट पंच मार्कस यांनी त्याची भेट घेतली. या भेटीत विनोद कांबळीने त्यांना सांगितले की, तो ठीक आहे, सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका. विनोद कांबळीच्या मित्राने सांगितले की, जेव्हा तो त्याला भेटला तेव्हा तो खूप खुश दिसत होता.

त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. आता तो पूर्वीपेक्षा चांगला आहे, नीट चालण्यास सक्षम आहे, स्वतः अन्नप्राशन करू शकतो आणि कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो. त्याचा मुलगाही वडिलांप्रमाणे डावखुरा फलंदाज आहे आणि वडिलांकडून फलंदाजीच्या टिप्सही घेतो. गुरुवारी (८ ऑगस्ट) दुपारी रिकी आणि मार्कसने विनोद कांबळीसोबत सुमारे ५ तास वेळ घालवला. यावेळी विनोद कांबळी यांनी बरीच जुनी हिंदी गाणीही गायल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.

५२ वर्षीय विनोद कांबळी हा गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त होता. २०१३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लीलावती रुग्णालयात नेले होते.

विनोद कांबळीचा हा व्हिडिओ जुना

विनोद कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हिरवा टी-शर्ट घालून बाईकजवळ उभा असल्याचे दिसत आहे. यामध्ये त्याला नीट उभे राहता येत नाही आणि चालताही येत नाही. काही लोकांच्या मदतीने तो चालताना दिसत आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा चाहते चिंतेत पडले आणि त्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल ट्विट करण्यास सुरुवात केली.

विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द

माजी भारतीय फलंदाज विनोद कांबळीने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत १७ कसोटी सामन्यांमध्ये १०८४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४७७ धावा आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या १२९ सामन्यांमध्ये ९९६५ धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या