भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. विनोद कांबळी हा त्याच्या काळातील महान फलंदाज होता. याशिवाय तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आहे.
विनोद कांबळीने १७ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तो १९९३ ते २००० पर्यंत भारताकडून खेळला. कांबळी अखेरचा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये २००४ मध्ये दिसला होता.
मात्र, सध्या विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. तसेच, विनोद कांबळीची अवस्था अशी झाली आहे, यावर विश्वास बसत नाही.
वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळीला त्याच्या पायांवर चालता येत नसल्याचे दिसत आहे. वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी विनोद कांबळी याची प्रकृती खूपच खालावली आहे.
कांबळीची तब्येत खूपच खालावलेली दिसत असून त्याला चालण्यासाठी आधाराची गरज आहे. यानंतर, आता विनोद कांबळी हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, विनोद कांबळी याच्या आरोग्याच्या समस्या काही नवीन नाहीत. नुकतेच त्याने सांगितले होते की, हृदयाशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त ते डिप्रेशनने त्रस्त आहे. या काळात तो औषधे घेत आहे, परंतु त्याला नेहमी रुग्णालयात जावे लागते.
२०१० च्या सुरुवातीला विनोद कांबळी याची प्रकृती खूपच खालावली होती. मात्र यानंतर बरीच सुधारणा दिसून आली. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांसाठी दु:खद आहे. विनोद कांबळी हे त्यांच्या काळातील महान फलंदाज होता हे विशेष. क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.