आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष ठसा उमटवणाऱ्या विक्रांत मेस्सी याला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. एका मुलाखतीत विक्रांत मॅसीने हा खुलासा केला. दिनेश कार्तिकच्या संघर्षकथेनेही विक्रांत खूप प्रभावित झाला आहे. यामुळेच विक्रांतला दिनेश कार्तिकच्या बायोपिकमध्ये काम करायचे आहे.
विक्रांतचे नुकतेच रिलीज झालेले दोन बायोपिक चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले होते. विशेषत: 12th फेल कमाईचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडले होते. 12th फेल हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित होता.
याशिवाय OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झालेल्या निठारी हत्याकांडावर आधारित सेक्टर ३६ मधील विक्रांतचा अभिनयही लोकांना प्रचंड आवडला.
दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास नव्हती. मात्र, त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी नक्कीच मिळाली. कार्तिकने भारतासाठी २६ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ६० टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिकने त्याच्या कारकिर्दीत १०२५ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये १ शतक आणि ७ अर्धशतकं झळकावली.
याशिवाय कार्तिकने वनडेमध्ये १७५२ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कार्तिकने ९ अर्धशतकंही झळकावली तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या नावावर ६८६ धावा आहेत.
टीम इंडियाकडून खेळण्यासोबतच कार्तिकने इंडियन प्रीमियर लीगमध्येही आपली प्रतिभा दाखवली. कार्तिकने आयपीएलमध्ये फिनिशरची भूमिका केली होती. त्याने या लीगमध्ये २५७ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १३५.३६ च्या स्ट्राइक रेटने ४८४२ धावा केल्या. मात्र, कार्तिकने आयपीएल २०२४ नंतर या लीगमधूनही निवृत्ती जाहीर केली होती.