विजय हजारे ट्रॉफीत शार्दुल ठाकूरने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे शार्दुलने गोलंदाजीत नाही तर फलंदाजीत वादळ निर्माण केले. त्याने अवघ्या २८ चेंडूत ७३ धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने ८ षटकार आणि २ चौकार ठोकले.
वास्तविक, विजय हजारे ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पाचव्या फेरीचे सामने आज खेळले जात आहेत. यामध्ये आज मुंबई आणि नागालँड संघ आमनेसामने असून या सामन्यात मुंबईने धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबईने ५० षटकात ७ बाद ४०३ धावा ठोकल्या आहेत.
नागालँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी शार्दुल ठाकूर मुंबईचा कर्णधार आहे. त्याने खालच्या फळीत येऊन तुफानी फलंदाजी केली.
या सामन्यात नागालँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मुंबईने त्यांचा हा निर्णय चुकीचा सिद्ध केला.
या सामन्यात मुंबईसाठी ओपनिंगसाठी आलेल्या आयुष म्हात्रे आणि अंककृष्ण रघुवंशी यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी झाली.
रोहित आणि कोहलीची हकालपट्टी करण्यासाठी हिंम्मत पाहिजे, माजी क्रिकेटपटूनं BCCI लाच दिलं ओपन चॅलेंज!
यानंतर आंगकृष्ण रघुवंशी ५६ धावा करून बाद झाला, मात्र आयुषची तुफानी फलंदाजी कायम राहिली आणि त्याने ११७ चेंडूत ११ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १८१ धावांची जबरदस्त खेळी केली.
यानंतर सिद्धेश लाड आणि प्रसाद पनवार यांनी ३९ आणि ३८ धावांची खेळी खेळली, मात्र ते बाद झाल्यानंतर कर्णधार शार्दुल ठाकूरने खालच्या फळीत वादळ निर्माण केले. त्याने २८ चेंडूत ८ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी खेळली आणि संघाची धावसंख्या ४०३ पर्यंत नेण्यात मोठा वाटा उचलला.
या काळात शार्दुलचा स्ट्राइक रेट २६०.७१ होता. नागालँडकडून दीप बोराने सर्वाधिक ३ बळी घेतले.
संबंधित बातम्या