Vijay Hazare trophy 2024-25 : बीसीसीआयच्या देशांतर्गत हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यशस्वीपणे उरकल्यानंतर आता एकदिवसीय स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ शनिवारपासून (२१ डिसेंबर) सुरू होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ येत आहे, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाची या स्पर्धेवर नजर असेल. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्स दिसणार आहेत. स्पर्धेचे सामने ६ शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये ३८ संघ सहभागी होणार असून अंतिम फेरीसह एकूण १३५ सामने खेळवले जाणार आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केरळचे कर्णधारपद भूषवल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसन याला विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आले. संघाच्या सराव सत्राला उपस्थित न राहिल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या तीन फेऱ्यांसाठी मुंबईच्या संघात पृथ्वी शॉचा समावेश नाही.
स्पर्धेसाठी ३८ संघांची ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ, ब आणि क गटात प्रत्येकी ८ संघ आहेत, तर ड आणि ई गटात प्रत्येकी ७ संघ सहभागी आहेत. ५ गटातील दोन संघ बाद फेरीत पोहोचतील. तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना संघ ६ ते १० पर्यंत क्रमवारी दिली जाईल.
तर त्यांच्या गटात पहिले स्थान मिळवणारे ५ संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. ७-१० संघ पुढे जाण्यासाठी दोन प्री-क्वार्टर फायनल खेळतील, तर सहाव्या क्रमांकाचा संघ देखील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल.
अ गट: हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर.
ब गट: राजस्थान, महाराष्ट्र, सेवा, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र, मेघालय, सिक्कीम.
क गट: कर्नाटक, मुंबई, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पाँडेचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड.
गट ड: तामिळनाडू, विदर्भ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम.
गट ई: बंगाल, केरळ, त्रिपुरा, मध्य प्रदेश, दिल्ली, बडोदा, बिहार.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा बाद फेरीचे सामने ९ जानेवारी २०२५ रोजी सुरू होतील. फायनल १९ जानेवारीला होणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील सर्व बाद सामने वडोदरा येथे होणार आहेत.
विजय हजारे ट्रॉफीची ग्रुप फेरी लाईव्ह स्ट्रीम किंवा टेलिकास्ट केला जाणार नाही. पण नॉकआउट सामने अनुक्रमे JioCineam आणि Sports18 वर स्ट्रीम आणि टेलिव्हिजन केले जातील.
संबंधित बातम्या