विजय हजारे ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. बडोद्याच्या कोटम्बी स्टेडियमवर महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ३ बाद ३८० धावांचा डोंगर उभारला आहे.
विदर्भाकडून सलामीवीर ध्रुव शौरी आणि यश राठोड यांनी धमाकेदार फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी ३४ षटकात २४४ धावांची सलामी दिली. शौरी (११४) आणि राठोड (११६) दोघांनी शतकं ठोकली.
यानंतर शेवटी कर्णधार करूण नायर याने वादळी फलंदाजी करताना ८८ धावा फटकावल्या त्याने ४४ चेंडूत ५ षटकार आणि ९ चौकार मारले. तर जितेश शर्माने ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चांगलाच अंगटल आला. महाराष्ट्राच्या गोलंदाजांना काहीच करता आले नाही. केवळ मुकेश चौधरी याने ९ षटकात २ विकेट घेतल्या. पण त्याने ८० धावा खर्च केल्या.
विदर्भ- ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर (कर्णधार), अपूर्व वानखडे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, पार्थ रेखाडे, यश ठाकूर, दर्शन नळकांडे.
महाराष्ट्र- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (विकेटकीपर), सत्यजीत बच्छाव, मुकेश चौधरी, रजनीश गुरबानी, प्रदीप दधे.
संबंधित बातम्या