मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy: विदर्भाने उपांत्य फेरीत मध्य प्रदेशला ६२ धावांनी हरवलं; आता ट्रॉफीसाठी मुंबईशी लढणार

Ranji Trophy: विदर्भाने उपांत्य फेरीत मध्य प्रदेशला ६२ धावांनी हरवलं; आता ट्रॉफीसाठी मुंबईशी लढणार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 06, 2024 12:33 PM IST

Ranji Trophy 2023-24 2nd Semifinal: रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विदर्भाने मध्य प्रदेशचा ६२ धावांनी पराभव केला.

VID vs MP, Ranji Trophy 2023-24 Semi final
VID vs MP, Ranji Trophy 2023-24 Semi final

Ranji Trophy: रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात विदर्भाने मध्य प्रदेशला ६२ धावांनी पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली. नागपुरात खेळल्या गेलेल्या या सामन्यात ३०३ लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा दुसरा डाव २५८ धावांवर आटोपला. आता फायनलमध्ये विदर्भाचा सामना ४१ वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबईशी होणार आहे.

रणजी ट्रॉफी २०२३-२४ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात विदर्भाने जोरदार पुनरागमन करत मध्य प्रदेशचा पराभव करून अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केले. विदर्भ आणि मुंबई यांच्यात ८ मार्चपासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात खेळला गेला, जो तीन दिवसांत संपला. मुंबई विरुद्ध तामिळनाडू उपांत्य फेरीचा सामना एकतर्फी ठरला. पण विदर्भाने विदर्भ विरुद्ध मध्य प्रदेश उपांत्य फेरीचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. पहिल्या डावात आघाडी घेऊनही मध्य प्रदेशने विजयाची नोंद केली. या सामन्यात पाचव्या दिवशी मध्य प्रदेशला ९३ धावांची गरज होती. तर, विदर्भाला चार विकेट्सची गरज होती.

विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात अवघ्या १७० धावांत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात २५२ धावा करत आघाडी घेतली. विदर्भाने दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने पुनरागमन केले. त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. यश राठोडने २०० चेंडूत १४१ धावा केल्या होत्या. त्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात ४०२ धावा केल्या. यश शिवाय अमन मोखाडेने ५९ धावांची खेळी खेळली. मध्य प्रदेशकडून अनुभव अग्रवालने पाच विकेट घेतल्या.

अशाप्रकारे मध्य प्रदेशला विजयासाठी ३२१ धावांचे लक्ष्य मिळाले. यश दुबेने ९४ धावांची खेळी खेळली. जोपर्यंत तो क्रीजवर राहिला तोपर्यंत त्याने मध्य प्रदेशच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. तो बाद झाल्यानंतर सामना विदर्भाच्या बाजूने झुकला. त्यानंतर मध्य प्रदेशचा संघ २५८ धावांवर सर्वबाद झाला. ८ मार्चपासून मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

IPL_Entry_Point