Sports Journalist Harpal Singh Bedi Passes Away : देशातील दिग्गज क्रीडा पत्रकार हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. क्रीडा पत्रकार म्हणून हरपाल सिंग बेदी यांची कारकीर्द जवळपास ४ दशके चालली. हरपाल सिंह बेदी हे दीर्घकाळ आजाराने त्रस्त होते. अखेर शनिवारी (१५ जून) त्यांनी जगाचा निरोप घेतला.
हरपाल सिंग बेदी यांचे निधन हा क्रीडा जगतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भारतातील मोजक्या प्रसिद्ध क्रीडा पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होता.
हरपाल सिंग बेदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पत्नीचे नाव रेवंती आणि मुलीचे नाव पल्लवी आहे. हरपाल सिंग बेदी यांच्या पश्तात पत्नी आणि मुलगी आहे. हरपाल सिंग बेदी हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे क्रीडा संपादक होते.
याशिवाय त्यांनी आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘द स्टेटमन’ वृत्तपत्राचे सल्लागार संपादक म्हणूनही काम केले. बेदी बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते.
हरपाल बेदी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फिरकी गोलंदाज दिवंगत बिशन सिंग हे बेदी यांचे जवळचे मित्र होते. अनेक प्रसंगी लोकांनी त्यांना बिशनसिंग बेदीच समजायचे. बिशनसिंग बेदी यांचे २०२३ मध्ये निधन झाले. ते एकदा म्हणाले होते ते, 'आम्ही जवळचे मित्र आहोत, तुम्हाला माहिती आहे, मी 'बीएसबी' आहे, तो 'एचएसबी' आहे. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो.'
प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एम.फिल केलेल्या बेदी यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रीडा पत्रकारितेतील वडील मानले होते.
१९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून पीटी उषाने जागतिक कीर्ती मिळवली तेव्हापासून ते देशाच्या क्रीडा क्षेत्रातील बदल आणि घडामोडींचे साक्षीदार होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक गेम्समध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, त्या क्षणाचे साक्षीदारही हरपाल बेदी होते. बेदींची कीर्ती भारताबरोबरच पाकिस्तानातही होती.
२००४ आणि २००५ मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघासोबत पाकिस्तानचा दौरा केला तेव्हा ते पाकिस्तानी पत्रकारांमध्ये लोकप्रिय झाले. त्याच्या हसतमुख व्यक्तिमत्त्वासाठी तो स्थानिक पत्रकारांमध्ये ते लोकप्रिय झाले होते.
संबंधित बातम्या