मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : व्यंकटेश अय्यरने फ्लाइंग किस कोणाला दिला? ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

Viral Video : व्यंकटेश अय्यरने फ्लाइंग किस कोणाला दिला? ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 30, 2024 05:24 PM IST

venkatesh iyer flying kiss : आरसीबीविरुद्धच्या अर्धशतकानंतर व्यंकटेश अय्यरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीला फ्लाइंग किस दिला.

venkatesh iyer flying kiss to his fiancee : व्यंकटेश अय्यरने फ्लाइंग किस कोणाला दिला
venkatesh iyer flying kiss to his fiancee : व्यंकटेश अय्यरने फ्लाइंग किस कोणाला दिला

KKR vs RCB IPL 2024 highlights : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024 ) १७व्या हंगामातील १०व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट्सनी पराभव केला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी (२९ मार्च) झालेल्या सामन्यात केकेआरला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य त्यांनी १६.१ षटकात पूर्ण केले.

या सामन्यात केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर व्यंकटेश अय्यरने प्रेक्षकांच्या दिशेने पाहत 'फ्लाइंग किस' दिले. यानंतर व्यंकटेश अय्यरने हे फ्लाइंग किस कोणाला दिले? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

व्यंकटेश अय्यरने फ्लाइंग किस कोणाला दिला?

आरसीबी आणि केकेआर यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी व्यंकटेश अय्यरची पार्टनर श्रुती रघुनाथनही आली होती.

वास्तविक व्यंकटेश आरसीबीविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ३० चेंडूंचा सामना करताना ५० धावा केल्या. व्यंकटेशच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकानंतर व्यंकटेशने आपली जोडीदार श्रुतीला फ्लाइंग किस दिला. हा सामना पाहण्यासाठी श्रुतीही बंगळुरूला पोहोचली होती.

श्रुती आणि व्यंकटेश यांची एंगेजमेंट झाली आहे. या दोघांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये एंगेजमेंट केली होती. व्यंकटेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली होती. व्यंकटेशची होणारी बायको श्रुती ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. तिनी बी.कॉम.चे शिक्षण घेतले आहे. यासोबतच तिने फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदवीही घेतली आहे.

व्यंकटेश अय्यरचे आयपीएल करिअर

व्यंकटेश अय्यरने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत ३८ सामन्यात १०१३ धावा केल्या आहेत. यात त्याने १ शतक आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. अय्यरने या मोसमात २ सामन्यात ५७ धावा केल्या आहेत. व्यंकटेशने गेल्या मोसमात १४ सामन्यांत ४०४ धावा केल्या होत्या. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती.

कोलकाता नाईट रायडर्सने सलग दुसरा सामना जिंकला आहे. पहिला सामना त्यांनी ४ धावांनी जिंकला होता. त्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव झाला. केकेआरचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. हा सामना ३ एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

WhatsApp channel