Varun Chakravarthy Injury : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला या सामन्यातून बाहेर राहावे लागले. पिंढरीच्या दुखण्यामुळे चक्रवर्ती या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार रोहित शर्माने याबाबत माहिती दिली.
वरुणचे अनफिट असणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. यशस्वी जैस्वाल याच्या जागी वरुणचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
उजव्या हाताचा लेग-स्पिनर वरुण चक्रवर्ती याने कटक येथे इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १ बळी घेतला. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी करत १४ बळी घेतले होते.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, आदिल रशीद, साकिब महमूद.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नवीनतम भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती. हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
नॉन-ट्रॅव्हलिंग सब्स्टीट्यूट : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे
संबंधित बातम्या